Share Market : मधल्या घसरणीनंतर शेअर बाजार पुन्हा सावरत आहे. काल, बुधवारी सेन्सेक्स आणि निफ्टी वधारून बंद झाले. या सगळ्या पार्श्वभूमीवर मार्केट एक्सपर्ट्सनी १० शेअर्सची शिफारस केली आहे. यात ५ ब्रेकआऊट स्टॉक्स आहेत.
चॉइस ब्रोकिंगचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सुमित बागरिया यांनी आजसाठी ५ ब्रेकआऊट शेअर्ससह ७ शेअर्सची शिफारस केली आहे. आनंद राठी येथील टेक्निकल रिसर्चचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे यांनी ३ शेअर्स सुचवले आहेत.
यात एल अँड टी फायनान्स लिमिटेड, एलटीआय इंडस्ट्रीज लिमिटेड, बीएसईएलटीडी आणि पेट्रोनेट एलएनजी लिमिटेड, टाटा केमिकल्स लिमिटेड, एरोफ्लेक्स इंडस्ट्रीज, स्वराज इंजिन्स, ग्रीव्हज कॉटन, झोटा हेल्थ केअर आणि अवंती फीड्स यांचा समावेश आहे.
> सुमित बगरिया यांचे शेअर्स
एल अँड टी फायनान्सचा शेअर १४६.१६ रुपये दरानं खरेदी करा. स्टॉपलॉस १४१ रुपये ठेवा.
हा शेअर ६२९५ रुपयांच्या टार्गेटसाठी ५८८२.७५ रुपये स्टॉपलॉस सह ५६७६ रुपयांना खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
> गणेश डोंगरे यांचे शेअर्स
बीएसईचा शेअर ५६०० रुपयांचं टार्गेट ठेवून ५३६० रुपये खरेदीची शिफारस केली आहे. स्टॉपलॉस ५१५० रुपये ठेवण्याची शिफारस केली आहे.
पेट्रोनेट एलएनजी हा शेअर ३०१ रुपयांना खरेदी करा. ३१५ रुपयांच्या टार्गेट प्राइससाठी २९२ रुपये स्टॉप लॉस ठेवा.
टाटा केमिकल्स ९६२ रुपयांना खरेदी करा. टार्गेट ९९० रुपये आणि स्टॉपलॉस ९५० रुपये ठेवा.
> सुमित बागरिया यांचे ५ ब्रेकआऊट शेअर्स
एरोफ्लेक्स इंडस्ट्रीज २३३.८० वर खरेदी करावा. टार्गेट २५० ठेवावं आणि स्टॉपलॉस २२५ रुपये ठेवावा.
स्वराज इंजिन्स या शेअरला 'बाय' रेटिंग असून टार्गेट प्राइस ३,४५० रुपये आहे. यासोबतच ३१११ रुपये स्टॉप लॉस आहे.
हा शेअर २६५.१५ रुपयांना खरेदी करून टार्गेट २८५ रुपये ठेवून स्टॉपलॉस २५५ रुपये ठेवा.
झोटा हेल्थ केअर ९३०.३० रुपयांना खरेदी करा. १००० रुपयांचं टार्गेट आणि ९०० रुपयांचा स्टॉपलॉस लावा.
हा शेअर ७४० रुपयांच्या टार्गेटसह ६९७.९५ रुपयांना खरेदी करा आणि ६७० रुपयांवर स्टॉपलॉस ठेवायला विसरू नका.
संबंधित बातम्या