Stocks To Buy : अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर आज खरेदीसाठी तज्ज्ञांनी सुचवले हे १० शेअर्स
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Stocks To Buy : अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर आज खरेदीसाठी तज्ज्ञांनी सुचवले हे १० शेअर्स

Stocks To Buy : अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर आज खरेदीसाठी तज्ज्ञांनी सुचवले हे १० शेअर्स

Jan 08, 2025 10:25 AM IST

Stocks To Buy Today : चिनी व्हायरसमुळं शेअर बाजारात सध्या अस्थिरतेचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर इंट्राडे खरेदीसाठी आज तज्ज्ञांनी काही शेअर्स सुचवले आहेत.

Stocks To Buy : अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर आज खरेदीसाठी तज्ज्ञांनी सुचवले हे १० शेअर्स
Stocks To Buy : अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर आज खरेदीसाठी तज्ज्ञांनी सुचवले हे १० शेअर्स

Share Market Updates : एचएमपीव्ही व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जगभरात सध्या भीतीचं वातावरण असून शेअर बाजारातही त्याचं प्रतिबिंब उमटत आहे. शेअर बाजार सावध वाटचाल करत आहे. या पार्श्वभूमीवर मार्केट एक्सपर्ट्सनी ५ ब्रेकआऊट स्टॉक्ससह १० शेअर्सची शिफारस केली आहे.

चॉइस ब्रोकिंगचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सुमित बगरिया यांनी आज दोन शेअर निवडीची शिफारस केली आहे. याशिवाय आज खरेदी करावयाच्या ब्रेकआऊट स्टॉकसंदर्भात सुमित बगाडिया यांनी इंद्रप्रस्थ मेडिकल कॉर्पोरेशन लिमिटेड, विशाल मेगा मार्ट लिमिटेड, स्काय गोल्ड लिमिटेड, मिंडा कॉर्पोरेशन लिमिटेड आणि केएफआयएन टेक्नॉलॉजीज लिमिटेड खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तर आनंद राठी येथील टेक्निकल रिसर्चचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे यांनी तीन स्टॉकची शिफारस केली आहे. यात मॅक्स हेल्थकेअर इन्स्टिट्यूट लिमिटेड, भारत डायनॅमिक्स लिमिटेड, इंडसइंड बँक लिमिटेड, गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनीअर्स लिमिटेड आणि एसबीआय कार्ड्स अँड पेमेंट सर्व्हिसेस लिमिटेड यांचा समावेश आहे.

सुमित बागरिया यांचे ब्रेकआऊट स्टॉक्स

इंद्रप्रस्थ मेडिकल कॉर्पोरेशन

हा शेअर ५६५.८० रुपयांना खरेदी करा. लक्ष्य ६०५ रुपये आणि स्टॉप लॉस ५४५ रुपये ठेवा.

विशाल मेगा मार्ट लिमिटेड

हा शेअर ११३.८५ रुपयांना खरेदी करा. १२० रुपयांचे टार्गेट ठेवा आणि १०९ रुपयांवर स्टॉपलॉस ठेवायला विसरू नका.

स्काय गोल्ड लिमिटेड

हा शेअर ३८९.६५ रुपयांना खरेदी करा. ४२० रुपयांचे टार्गेट आणि ३८० रुपये स्टॉप लॉस ठेवा.

मिंडा कॉर्पोरेशन लिमिटेड

आज मिंडाकॉर्प हा शेअर ५३०.५० रुपयांना खरेदी करा. लक्ष्य ५७० रुपये आणि स्टॉप लॉस ५१० रुपये ठेवा.

केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड

केफिनटेक १४७५.२५ रुपयांना खरेदी करा. लक्ष्य १५९० रुपयांचं ठेवा आणि स्टॉपलॉस १४२५ रुपयांवर लावा.

सुमित बागरिया इतर शेअर्स

मॅक्स हेल्थकेअर इन्स्टिट्यूट लिमिटेड

हा शेअर १,२०४.९५ रुपयांना खरेदी करा. १,२८९ रुपयांचे टार्गेट ठेवा आणि १,१६२ रुपयांचा स्टॉपलॉस ठेवायला विसरू नका.

भारत डायनॅमिक्स लिमिटेड

बीडीएल हा शेअर ११८४.७५ रुपयांना खरेदी करा. लक्ष्य १२६८ रुपयांचं आणि स्टॉपलॉस ११४३ रुपये ठेवा.

गणेश डोंगरे यांची शिफारस

इंडसइंड बँक

हा शेअर ९८५ रुपयांना खरेदी करा. टार्गेट प्राइस १०१० रुपये आणि स्टॉपलॉस ९७० रुपयांवर लावा.

गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनीअर्स लिमिटेड (जीआरएसई)

गार्डन रीच हा शेअर १,५७५ रुपयांना खरेदी करा. लक्ष्य १,६२० रुपये आणि स्टॉपलॉस १,५४० रुपये ठेवा.

एसबीआय कार्ड्स अँड पेमेंट सर्व्हिसेस लिमिटेड 

एसबीआय कार्ड शेअर ७३२ रुपयांना खरेदी करा. लक्ष्य ७५० रुपयांचं ठेवा आणि स्टॉपलॉस ७२० रुपयांवर ठेवा.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. तज्ज्ञांची मतं, सूचना व शिफारशी त्यांच्या वैयक्तिक आहेत. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner