eraaya lifespaces share price : इराया लाइफस्पेसेस हा शेअर वर्षभरापासून तेजीत असून त्यानं गुंतवणूकदारांना जोरदार नफा मिळवून दिला आहे. कंपनीचे शेअर्स वर्षभरात ६,००० टक्क्यांनी वधारले असून सप्टेंबर २०२३ पासून नव्या विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत.
वर्षभरापूर्वी या शेअरची किंमत १३ रुपये होती. इराया लाइफस्पेसचा शेअर आज ५ टक्क्यांनी वधारून ८४०.५० रुपयांच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. ३० जुलै २०२० रोजी लिस्टिंग झाल्यापासून इराया लाइफस्पेसच्या शेअरच्या किंमतीत १०४५४ टक्के वाढ झाली आहे.
जीसीएल ब्रोकिंगचे रिसर्च अॅनालिस्ट वैभव कौशिक यांनी सांगितले की, इराया लाइफस्पेसच्या शेअरच्या किमतीनं लिस्टिंगनंतर चांगला परतावा दिला आहे. सध्या ८७० रुपयांच्या पातळीवर त्यास प्रतिकार होत आहे. हा शेअर ६७० रुपयांपर्यंत खाली जाण्याची शक्यता आहे.
स्टॉक एक्स्चेंज फाइलिंगनुसार, इरायाच्या नेतृत्वाखालील कन्सोर्टियमनं जून २०२४ मध्ये एबिक्स इंकची १०० टक्के इक्विटी खरेदी करण्यासाठी गेल्या आठवड्यात बोली लावली होती. ही बोली सर्वोच्च आणि सर्वोत्तम म्हणून स्वीकारली गेली आणि यूएस बँकरप्सी कोर्टाच्या देखरेखीखाली कंपनीला लिलाव प्रक्रियेचा विजेता म्हणून घोषित करण्यात आलं. सुमारे ३६१ दशलक्ष डॉलर्स (अंदाजे ३००९ कोटी रुपये) या बोलीचं मूल्य आहे.
कंपनीची निव्वळ विक्री आर्थिक वर्ष २०२४ च्या चौथ्या तिमाहीत २ कोटी रुपये होती, तर निव्वळ नफा आर्थिक वर्ष २०२३ च्या चौथ्या तिमाहीतील ०.०५ कोटी रुपयांवरून आर्थिक वर्ष २०२४ च्या चौथ्या तिमाहीत ०.९५ कोटी रुपयांवर पोहोचला. म्हणजेच यात १८८७.५ टक्के वाढ दिसून आली.
कंपनीच्या वार्षिक निकालानुसार, निव्वळ नफा आर्थिक वर्ष २०२३ च्या तुलनेत आर्थिक वर्ष २०२४ मध्ये ३४१.६ टक्क्यांनी वाढून ०.३४ कोटी रुपये झाला, तर निव्वळ विक्री १,५२,३११ टक्के वाढून २९७.२० कोटी झाली. इराया लाइफस्पेसेस ही आघाडीची लाइफस्टाइल आणि हॉस्पिटॅलिटी कंपनी आहे.
संबंधित बातम्या