EPF interest hike : अर्थसंकल्पाआधीच केंद्र सरकारची कर्मचाऱ्यांना मोठी भेट; पीएफवर मिळणार जास्त व्याज
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  EPF interest hike : अर्थसंकल्पाआधीच केंद्र सरकारची कर्मचाऱ्यांना मोठी भेट; पीएफवर मिळणार जास्त व्याज

EPF interest hike : अर्थसंकल्पाआधीच केंद्र सरकारची कर्मचाऱ्यांना मोठी भेट; पीएफवर मिळणार जास्त व्याज

Jul 12, 2024 09:01 AM IST

EPFO Interest Rate Hike: अर्थसंकल्पापूर्वी केंद्र सरकारची कर्मचाऱ्यांना मोठी भेट, आता पीएफवर मिळणार अधिक व्याज मंजूर केले आहे. EPFO ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स हँडलवर ही माहिती दिली आहे.

अर्थसंकल्पापूर्वी केंद्र सरकारची कर्मचाऱ्यांना मोठी भेट, आता पीएफवर मिळणार अधिक व्याज
अर्थसंकल्पापूर्वी केंद्र सरकारची कर्मचाऱ्यांना मोठी भेट, आता पीएफवर मिळणार अधिक व्याज

EPFO Interest Rate Hike: अर्थसंकल्पापूर्वी केंद्र सरकारने नागरिकांना मोठी भेट दिली आहे. ईपीएफओ ​​सदस्यांसाठी हि आनंदाची बातमी आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ठेवींवर व्याजदर वाढवले ​​आहेत. या वर्षी फेब्रुवारीमध्ये, ईपीएफओ​​ने २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी ८.२५ टक्के व्याजदराची घोषणा केली होती, ज्याला वित्त मंत्रालयाने मान्यता दिली आहे.

सरकारने अधिसूचित केले व्याज दर

ईपीएफओने २०२३-२४ साठी व्याजदर गेल्या वर्षीपासून ८.१५ टक्क्यांवरून ८.२५ टक्के इतका वाढवला आहे. या बाबत एक्स हँडलवर माहिती देताना, ईपीएफओ​​ने सांगितले की, ईपीएफ सदस्यांसाठी २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी ८.२५ टक्के व्याजदर इतके वाढवण्यात आले आहे. याची मे महिन्यात केंद्र सरकारने अधिसूचना काढली आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना पीएफचे व्याज मिळण्याची प्रतीक्षा लागली आहे.

फेब्रुवारीमध्ये करण्यात आली होती व्याजदर वाढीची घोषणा

केंद्रीय विश्वस्त मंडळाने फेब्रुवारी २०२४ मध्ये पीएफवरील व्याजदर वाढवण्याची घोषणा केली होती. पीएफचे व्याज दर हे ८.१५ टक्क्यांवरून ८.२५ टक्के करण्याचा निर्णय घेतला होता. सीबीटीच्या निर्णयानंतर, २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी ईपीएफ वरील व्याजदर वाढीचा प्रस्ताव मंजुरीसाठी वित्त मंत्रालयाकडे पाठवण्यात आला होता, ज्याला आता मंजुरी देण्यात आली आहे.

ईपीएफओने व्याज केले होते कमी

मार्च २०२२ मध्ये, एपीएफओ​​ने आपल्या सदस्यांना मोठा धक्का दिला होता. २०२१-२२ साठी ईपीएफवरील व्याज ८.१ टक्के करण्यात आले होते. व्याजात कपात केल्यानंतर ईपीएफओने व्याजदर १९७७-७८ नंतर सर्वात कमी केले होते. त्यावेळी ईपीएफचा व्याजदर ८ टक्के होता.

Whats_app_banner