मराठी बातम्या  /  बिझनेस  /  EPFO news : भविष्य निर्वाह निधी खात्यातून पैसे काढणे आता आणखी सोपे! फक्त ३ दिवसांत तुमच्या हातात येणार

EPFO news : भविष्य निर्वाह निधी खात्यातून पैसे काढणे आता आणखी सोपे! फक्त ३ दिवसांत तुमच्या हातात येणार

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
May 16, 2024 09:45 AM IST

EPFO News : नवीन सुविधेअंतर्गत, क्लेम सेटलमेंट कालावधी १० दिवसांवरून ३-४ दिवसांपर्यंत कमी करण्यात येणार आहे. तर ऑटो-मोड सेटलमेंटद्वारे सदस्यांना १ लाख रुपयांपर्यंत पैसे पीएफ खात्यातून काढता येणार आहे. यापूर्वी ही मर्यादा ५० हजार रुपये होती.

ऑटो-मोड सेटलमेंटद्वारे सदस्यांना  १ लाख रुपयांपर्यंत पैसे पीएफ खात्यातून काढता येणार आहे. यापूर्वी ही मर्यादा ५० हजार रुपये होती.
ऑटो-मोड सेटलमेंटद्वारे सदस्यांना १ लाख रुपयांपर्यंत पैसे पीएफ खात्यातून काढता येणार आहे. यापूर्वी ही मर्यादा ५० हजार रुपये होती.

EPFO News : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) उपचार, शिक्षण, लग्न आणि घर खरेदीसाठी पैसे काढण्याची प्रक्रिया सुलभ केली आहे. यासाठी ऑटोमॅटिक क्लेम सेटलमेंटची (ऑटो-मोड सेटलमेंट) सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे तीन दिवसांत नागरिकांच्या खात्यात आता पैसे जमा होणार आहे. सध्या या प्रक्रियेला १० ते १५ दिवस लागतात.

ट्रेंडिंग न्यूज

Viral Video : डिझेल पराठ्यांची अनेकांना भुरळ! व्हायरल व्हिडिओमुळे उडाली खळबळ! रेस्टॉरंट मालकाने सांगितले सत्य

EPFO तून आगाऊ पैसे काढण्यासाठी या आधी  मोठा कालावधी लागतो. कारण ईपीएफ सदस्याची पात्रता, दाव्यासाठी सादर केलेली कागदपत्रे, केवायसी परिस्थिती, वैध बँक खाते इत्यादींची पडताळणी केली जाते. या प्रक्रियेत अनेकदा अवैध दावे हे रद्द केले जातात, किंवा नाकारले जातात. ही प्रक्रिया ऑनलिन होणार असल्याने  आता या प्रक्रियेतील मानवी हस्तक्षेप कमी होणार  आहे.

Ghatkopar Hoarding : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेला ६० तास उलटूनही बचावकार्य सुरूच; मृतांचा आकडा वाढला

१ लाख रुपयांपर्यंत पैसे काढता येणार

या प्रक्रियेत, आगाऊ रक्कम काढण्यासाठी करण्यात आलेला दावा हा आपोआप निकाली काढला जाणार आहे. केवायसी, पात्रता आणि बँक खाते पडताळणी आयटी टूल्सद्वारे हे दावे निकाली काढले जाणार आहेत.  यामुळे क्लेम सेटलमेंट कालावधी हा १० दिवसांवरून आता ३-४ दिवसांवर येणार आहे. ऑटो-मोड सेटलमेंटद्वारे सदस्य २ लाख रुपयांपर्यंत पैसे काढता येणार आहे.  यापूर्वी ही मर्यादा केवळ ५० हजार रुपये होती.

Madhuri Dixit : ‘धक धक’ गर्ल माधुरी दीक्षितचे हे १० छायाचित्र नाही पाहिले तर काय पाहिले? लावतील वेड

दावा नाकारला जाणार नाही

नवीन प्रक्रियेअंतर्गत, पूर्ण न झालेला कोणताही दावा रद्द केला जाणार नाही किंवा नाकारला जाणार नाही. हा दावा दुसऱ्या स्तरावरील तपासासाठी आणि मंजुरीसाठी पुढे नेण्यात येईल आणि त्यावर तोडगा काढण्यात येईल.

ऑटो मोड अंतर्गत पीएफ खात्यातून आगाऊ रक्कम काढण्यासाठी, ईपीएफओच्या ई-सेवा पोर्टलद्वारे अर्ज करावा लागेल. यासाठी सदस्याने फॉर्म-३१ ऑनलाइन भरून सबमिट करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

पैसे काढल्यावर पीएफचे किती नुकसान होते?

जर एखाद्याने खत्यातून १० हजार रुपये काढले तर त्याचे २० वर्षांनंतर 50 हजार रुपये आणि ३० वर्षांनंतर १ लाख १४ हजार रुपयांचे नुकसान होईल. जर आता २० हजार रुपये काढल्यास २० वर्षांनंतर १ लाख १ हजार रुपये आणि ३० वर्षांनंतर २ लाख २८ हजार रुपयांचे नुकसान होईल. ५० हजार रुपये काढल्यास २० वर्षांनंतर २ लाख ५३ हजार रुपये आणि ३० वर्षांनंतर ५ लाख ७१ हजार रुपयांचे नुकसान होईल. जर तुम्ही आज १ लाख रुपये काढले तर तोटा २० वर्षांनंतर ५ लाख ०७ हजार रुपये आणि ३० वर्षांत ११ लाख ४३ हजार रुपये होईल. आता २ लाख रुपये काढले तर १० लाख १५ हजार रुपये आणि २० वर्षांत २२ लाख ८७ हजार रुपयांचे नुकसान होईल.

WhatsApp channel

विभाग