मराठी बातम्या  /  बिझनेस  /  X New feature : तुमचं ट्विटर अकाऊंट आता मोबाइलचंही काम करणार; व्हिडिओ कॉल करता येणार

X New feature : तुमचं ट्विटर अकाऊंट आता मोबाइलचंही काम करणार; व्हिडिओ कॉल करता येणार

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Feb 29, 2024 11:32 AM IST

audio video calling feature on x : मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म 'एक्स'वरून आता व्हिडिओ आणि ऑडिओ कॉलही करता येणार आहे.

New Feature on X
New Feature on X

audio video calling feature on x : सोशल मीडिया क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांमध्ये ग्राहक खेचण्यासाठी जोरदार स्पर्धा सुरू आहे. त्यातूनच ग्राहकांना नवनव्या आणि स्वस्त सेवा पुरवल्या जात आहेत. अब्जाधीश उद्योजक एलॉन मस्क यांनी आता ‘एक्स’च्या (पूर्वीचे ट्विटर) युजर्ससाठी खास फीचर आणलं आहे. विशेष म्हणजे हे फीचर सर्वांसाठी मोफत असेल.

X च्या युजर्सना आता व्हॉइस आणि व्हिडिओ कॉलही करता येणार आहे. हा कॉल करण्यासाठी यूजर्सला फोन नंबर टाकण्याचीही गरज लागणार नाही. या सेवेचा लाभ घेण्यासाठी X च्या प्रीमियम सबस्क्रिप्शनची आवश्यकता नाही. सुरुवातीला हे फीचर केवळ प्रीमियम वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होते. आता ते सर्व वापरकर्त्यांसाठी आणलं जात आहे. X चं हे फिचर व्हॉट्सॲपसमोर आव्हान निर्माण करेल असं बोललं जात आहे.

'एक्स'चा इंजिनीअर एनरिक बॅरेगन यानं सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या फीचरची माहिती दिली आहे. 'कंपनी नॉन-प्रिमियम वापरकर्त्यांसाठी हळूहळू ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलिंग फीचर आणत आहे. नवीन फीचर आल्यानंतर युजर त्यांच्याशी यादीत असलेल्या इतर युजर्सना कॉल करू शकणार आहेत. कॉल कनेक्ट होण्यासाठी दोन युजर्समध्ये एकदा तरी संभाषण झालेलं असलं पाहिजे.

X वर असे करा कॉल

सर्वात आधी तुमच्या Android किंवा iOS स्मार्टफोनवर X ॲप उघडा आणि DM विभागात जा.

बोलणे सुरू करण्यासाठी फोन आयकॉनवर क्लिक करा आणि ऑडिओ किंवा व्हिडिओ कॉल निवडा. हे केल्यानंतर, रिसीव्हरला एक सूचना मिळेल की आपण त्यांना कॉल करू इच्छिता.

वरच्या उजव्या कोपऱ्यात दिलेल्या सेटिंगमध्ये जाऊन तुम्हाला कोण कॉल करू शकतो हे देखील तुम्ही सेट करू शकता.

कंपनीनं याआधी हे फीचर फक्त iOS आणि X प्रीमियम सबस्क्रिप्शनसाठी आणलं होतं.

WhatsApp channel

विभाग