मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Elon musk : अब्जाधीश एलन मस्क परफ्यूमनंतर आता बीयर विकणार, किंमत ८ हजार रुपये

Elon musk : अब्जाधीश एलन मस्क परफ्यूमनंतर आता बीयर विकणार, किंमत ८ हजार रुपये

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Apr 01, 2023 04:41 PM IST

Elon musk : टेस्लाचे संस्थापक आणि सीईओ एलन मस्क जगातील अब्जाधीशांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. ट्विटरचे अधिग्रहणही त्याने केले आहे. संपत्ती अंदाजे १८७ अब्ज डाॅलर्स आहे.

elon musk HT
elon musk HT

Elon musk : जगातील अब्जाधीशांच्या यादीतील दुसऱ्या स्थानी असलेल्या एलन मस्कची कंपनी टेस्लाने बीयर लाँन्च केली आहे. टेस्ला युरोपच्या जास्तीत जास्त ट्विटर हँडलने टेस्ला गिगाबीयला जगासमोर दाखल केले. त्याची किंमत ७९ युरो म्हणजेच ८ हजार रुपये आहे. टेस्लाच्या सायबरट्रॅक प्रेरित बीयरमध्ये पाच टक्के अल्कोहोल आहे. ही तीन बाॅटल पॅकमध्ये येते. प्रत्येक बाॅटलमध्ये ३३० मिली बीयर आहे. एलन मस्कने दीड वर्षापूर्वीच जर्मनीमध्ये एका कार्यक्रमात बीयर लाँन्च करणार असल्याची घोषणा केली होती.

जर्मनीमध्ये बनलेले टेस्ला गीगाबीयरचे बेल्जियम, चेक गणराज्य, डेनमार्क, जर्मनी, स्पेन, फ्रान्स, आर्यलँड, इटली, लक्समबर्ग, नेदरलँड, नाॅर्वे, आँस्ट्रिया, पोर्तुगाल, स्वित्झलँड, स्वीडन, यूकेमधूनही खरेदी करता येईल.

टेस्लाचे पहिले अल्कोहोलिक ड्रिंक टेस्ला टकीला होते. ज्याची किंमत २ डाॅलर्स होते. ग्राहकांना केवळ दोन बाॅटल्स आँर्डर करण्याची परवानगी होती. आता ईबेवर १५० ते २०० डाॅलर्स किंमतीत ती विकली जाते.

परफ्यूम्सही विकतात मस्क

गेल्या वर्षी मस्कने ब्रट हेयर फरफ्यूम ब्रँड लाँन्च केला होता. एलन मस्कने परफ्यूम्समध्ये १०० डाॅलर्स किंमत निश्चित केली होती. मस्क जगातील दुसऱ्या क्रमांकाचे अब्जाधीश आहेत. त्यांची संपत्ती १८७ अब्ज डाॅलर्स आहे.

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग