आणखी किती विक्रम रचणार! अवघ्या ३ रुपयांवरून ३ लाखांवर गेला 'हा' शेअर! तुमच्याकडं आहे का?
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  आणखी किती विक्रम रचणार! अवघ्या ३ रुपयांवरून ३ लाखांवर गेला 'हा' शेअर! तुमच्याकडं आहे का?

आणखी किती विक्रम रचणार! अवघ्या ३ रुपयांवरून ३ लाखांवर गेला 'हा' शेअर! तुमच्याकडं आहे का?

HT Marathi Desk HT Marathi
Nov 06, 2024 01:31 PM IST

Elcid Investments share price : एल्सिड इन्व्हेस्टमेंट्सच्या शेअरनं मार्केटमध्ये अक्षरश: धुमाकूळ घातला असून हा शेअर आता ३ लाखांच्या पुढं गेला आहे.

आणखी किती विक्रम रचणार! अवघ्या ३ रुपयांवरून ३ लाखांवर गेला 'हा' शेअर! तुमच्याकडं आहे का?
आणखी किती विक्रम रचणार! अवघ्या ३ रुपयांवरून ३ लाखांवर गेला 'हा' शेअर! तुमच्याकडं आहे का?

Crorepati Stock : एल्सिड इन्व्हेस्टमेंटचे शेअर्स सध्या दलाल स्ट्रीटवर सतत चर्चेत आहेत. एल्सिड इन्व्हेस्टमेंट्स हा देशातील सर्वात महागडा शेअर ठरला आहे. बुधवारी, ६ नोव्हेंबर रोजी कंपनीच्या समभागांनी ३ लाख रुपयांचा टप्पा ओलांडून नवा इतिहास रचला आहे. 

एल्सिड इन्व्हेस्टमेंटचा शेअर आजच्या ट्रेडिंग सत्रात ५ टक्क्यांनी वधारून ३०१५२१.४० रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. हा शेअरचा ५२ आठवड्यांतील नवा उच्चांक आहे. गेल्या चार ट्रेडिंग दिवसांपासून हा शेअर सातत्यानं ५ टक्क्यांच्या अप्पर सर्किटला धडक देत आहे. आजही या शेअरमध्ये फक्त खरेदीदारच दिसतात. पाच दिवसांत या शेअरमध्ये २१ टक्क्यांहून अधिक म्हणजे ५३,४५८.९० रुपयांची वाढ झाली आहे.

मागील आठवड्यात २९ ऑक्टोबर रोजी होल्डिंग कंपन्यांच्या किमतीसंदर्भात बीएसईकडून खास कॉल लिलाव करण्यात आला होता. या लिलाव सत्रात एल्सिड स्टॉकची किंमत सव्वा दोन लाख रुपये निश्चित करण्यात आली होती. 

एल्सिड इन्व्हेस्टमेंट लिमिटेडचे समभाग मंगळवारी, २९ ऑक्टोबर रोजी बीएसईवर (BSE) पुन्हा सूचीबद्ध झाले. शेअरची लिस्टिंग प्राइस २.२५ लाख होती, पण स्मॉलकॅप शेअरने दलाल स्ट्रीटवर इतिहास रचला आणि २,३६,२५० रुपयांवर पोहोचला. ही वाढ ६६,९२,५३५ टक्के इतकी आश्चर्यकारक होती. यावर्षी २१ जून रोजी हा शेअर केवळ ३.५१ रुपयांचा होता. तेव्हापासून त्याच्या शेअर्सचे व्यवहार बंद होते. रि-लिस्टिंगनंतर गेल्या ४ दिवसांपासून या शेअरला सातत्याने अप्पर सर्किट लागत आहे.

ही कंपनी अल्सिड इन्व्हेस्टमेंट आरबीआयसह गुंतवणूक कंपनी श्रेणीअंतर्गत नोंदणीकृत एनबीएफसी आहे. सध्या कंपनीचा स्वत:चा कोणताही ऑपरेटिंग बिझनेस नसला तरी एशियन पेंट्स सारख्या इतर बड्या कंपन्यांमध्ये कंपनीची बरीच गुंतवणूक आहे. त्याचे मार्केट कॅप ६,०३०.४३ कोटी रुपये आहे.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner