ज्या वेगानं उसळला, त्याच वेगानं कोसळला! एल्सिड इन्व्हेस्टमेंटचा शेअर किती गडगडला पाहा!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  ज्या वेगानं उसळला, त्याच वेगानं कोसळला! एल्सिड इन्व्हेस्टमेंटचा शेअर किती गडगडला पाहा!

ज्या वेगानं उसळला, त्याच वेगानं कोसळला! एल्सिड इन्व्हेस्टमेंटचा शेअर किती गडगडला पाहा!

HT Marathi Desk HT Marathi
Nov 11, 2024 03:07 PM IST

Elcid Investments Share Price : एल्सिड इन्व्हेस्टमेंट्सच्या शेअर्समध्ये सोमवारी 5% लोअर सर्किटची नोंद झाली, ज्यामुळे शेअर 313949.70 रुपयांवर पोहोचला. कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक येत्या मंगळवारी होणार आहे, जिथे तिमाही निकालांचा विचार केला जाईल.

ज्या वेगानं उसळला, त्याच वेगानं कोसळला! एल्सिड इन्व्हेस्टमेंटचा शेअर किती गडगडला पाहा!
ज्या वेगानं उसळला, त्याच वेगानं कोसळला! एल्सिड इन्व्हेस्टमेंटचा शेअर किती गडगडला पाहा!

Elcid Investments Share Price : स्मॉल कॅप एनबीएफसी एल्सिड इन्व्हेस्टमेंट्सचे शेअर्स सध्या चर्चेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून रॉकेटच्या वेगालाही लाजवणाऱ्या कंपनीच्या शेअरला आज ब्रेक लागला आणि हा शेअर थेट ५ टक्क्यांच्या लोअर सर्किटला भिडला. कंपनीचा शेअर ३१३९४९.७० रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. 

गेले काही दिवस सलग या शेअरला ५ टक्क्यांचं अप्पर सर्किट लागत होतं. त्यामुळं हा शेअर ३३०४७३.३५ रुपयांवर बंद झाला होता. त्यानंतर आज एका दिवसात त्यात १६५२३.६५ रुपयांची घसरण नोंदवण्यात आली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक याच आठवड्यात १२ नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्यात जुलै-सप्टेंबर २०२४ च्या तिमाही निकालांचा विचार करून त्याला मंजुरी देण्यात येणार आहे.

२९ ऑक्टोबरपासून या शेअरमध्ये सातत्याने वाढ होत होती. मागच्या आठवड्यात हा शेअर जवळपास एक लाख रुपयांपर्यंत वाढला होता. हा भारतातील सर्वात महागडा स्टॉक ठरला आहे. त्यासमोर एमआरएफ लिमिटेडचा शेअर आता खूपच मागे पडला आहे. एमआरएफचा शेअर आजचा भाव १,२३,०५४ रुपये आहे.

कसा राहिला शेअरचा प्रवास?

एल्सिड इन्व्हेस्टमेंट लिमिटेडचा शेअर २९ ऑक्टोबरलाच २,३६,२५० रुपयांच्या किंमतीवर पोहोचला होता. शेअरची लिस्टिंग किंमत २,२५,००० रुपये होती. स्पेशल कॉल लिलावापूर्वी हा शेअर बीएसईवर २१ जून २०२४ रोजी ३.५३ रुपयांवर बंद झाला होता. म्हणजेच या काळात त्यात ९४,१६,३२९ टक्के वाढ झाली. एनबीएफसीच्या शेअरचा शेअरहोल्डर्सना नफा देण्याचा चांगला ट्रॅक रेकॉर्ड आहे. २०२४ या आर्थिक वर्षासाठी एल्सिड इन्व्हेस्टमेंटने २५ रुपयांचा लाभांश दिला. आर्थिक वर्ष २०२३ साठी स्मॉल कॅप फर्मचा लाभांश देखील २५ रुपये होता.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner