eicher motors share price : बुलेट विक्री करणाऱ्या आयशर मोटर्स या कंपनीच्या शेअरमध्ये आज ८ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. दमदार तिमाही निकालानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी नोंदविण्यात आली. आयशर मोटर्सचा शेअर बीएसईमध्ये ४६९७.५५ रुपयांच्या पातळीवर उघडला. पण काही काळानंतर कंपनीचा शेअर ८ टक्क्यांहून अधिक वाढीनंतर ४९७२.५० रुपयांच्या पातळीवर पोहोचला.
आयशर मोटर्सचा निव्वळ नफा सप्टेंबर २०१९ अखेर संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत ८ टक्क्यांनी वाढून १,१०० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. बुधवारी ही माहिती देताना कंपनीने सांगितले की, सर्व बिझनेस सेगमेंटमध्ये जोरदार विक्री झाल्याने नफ्यात वाढ झाली आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला १,०१६ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता.
आयशर मोटर्सने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, सप्टेंबर तिमाहीत ऑपरेटिंग रेव्हेन्यू ४२६३ कोटी रुपये होता, जो दुसऱ्या तिमाहीतील आतापर्यंतचा सर्वोत्तम महसूल आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीचा ऑपरेटिंग महसूल ४,११५ कोटी रुपये होता.
आयशर मोटर्सच्या शेअरच्या किमती २०२४ मध्ये २२ टक्क्यांनी वाढल्या आहेत. तर या शेअरच्या किंमतीत १ वर्षात ३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ५१०४.५० रुपये आणि ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर ३५६४ रुपये आहे.
दुसऱ्या तिमाहीत आयशर मोटर्सची फ्लॅगशिप कंपनी रॉयल एनफिल्डने २,२५,३१७ मोटारसायकलींची विक्री केली. गेल्या आर्थिक वर्षात याच तिमाहीत कंपनीने २,२९,४९६ वाहनांची विक्री केली होती. आयशर मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक सिद्धार्थ लाल म्हणाले, 'सप्टेंबर तिमाहीत आम्ही रॉयल एनफिल्ड आणि व्हीईसीव्ही या दोन्ही कंपन्यांमध्ये गती कायम राखली.