Pawan Munjal : हिरो मोटोकाॅर्पचे अध्यक्ष पवन मुंजाल अडकले, मनी लाँन्ड्रिंग प्रकरणी ईडीचे घरावर छापे, शेअर्स गडगडले-ed searches hero moto chairman pawan munjal residence in money laundering probe ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Pawan Munjal : हिरो मोटोकाॅर्पचे अध्यक्ष पवन मुंजाल अडकले, मनी लाँन्ड्रिंग प्रकरणी ईडीचे घरावर छापे, शेअर्स गडगडले

Pawan Munjal : हिरो मोटोकाॅर्पचे अध्यक्ष पवन मुंजाल अडकले, मनी लाँन्ड्रिंग प्रकरणी ईडीचे घरावर छापे, शेअर्स गडगडले

Aug 01, 2023 04:04 PM IST

Pawan Munjal : हिरो मोटोकाॅर्पचे कार्यकारी अध्यक्ष पवन मुंजाल आणि इतर लोकांविरोधात छापेमारी सुरु केली आहे. ही छापेमारी मनीलाँन्ड्रिंग प्रकरणी (पीएमएल) च्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी करण्यात आली आहे.

pavan munjal HT
pavan munjal HT

Pawan Munjal : टू व्हिलर उत्पदक कंपनी हिरो मोटोकाॅर्पचे कार्यकारी अध्यक्ष पवन मुंजाल यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. ईडीने पवन मुंजाल यांच्या घरावर आणि विविध कार्यालयांवर छापेमारी केली आहे. ही छापेमारी मनी लाँन्ड्रिंग प्रकरणी घालण्यात आली आहे. सीएनबीसी टीव्ही १८ च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीने हिरो मोटोकाॅर्पच्या अध्यक्ष आणि सीईओच्या विरोधात केस रजिस्ट्रर केली आहे.

ईडीने ही कारवाई डिपार्टमेंट आँफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स प्रकरणी इनपूट मिळाल्यानंतर केली आहे. डीआयआयने पवन मुंजाल यांच्या एका जवळच्या नातेवाईकांनेही एअरपोर्टवर मोठ्या प्रमाणात अघोषित विदेशी मुद्रासह पकडले होते. या दरम्यान हिरो मोटोकाॅर्पचे शेअर्स क्रॅश झाले होते. आठवड्याच्या दुसऱ्या आठवड्यातही कंपनीचे शेअर्स किमान ५ टक्क्यांनी घसरून ३०३२.० रुपयांवर आले होते. आज हा शेअर्स ५२ आठवड्याच्या उच्चांकी पातळीवर पोहोचले. शेअर्सची उच्चांकी पातळी ३२४२.८५ रुपये आहे.

जून महिन्याच्या रिपोर्टमध्ये काॅर्पोरेट रिपोर्टमध्ये सांगितले होते की, काॅर्पोरेट प्रकरणाशी निगडित मंत्रालयाने एमसीएने कथित काॅर्पोरेट गव्हर्नन्स मुद्दयांवर हिरो मोटोकाॅर्प लिमिटेडविरोधात चाचणीचे आदेश दिले आहेत. रिपोर्टनुसारस हिरो मोटोकाॅर्पवर कथित प्रकरणी शेट कंपन्या चालवण्याचा आरोप आहे. कंपनी रजिस्ट्रारच्या पडताळणीत असाही निष्कर्ष निघाला आहे की, कंपनी आणि त्याच्याशी निगडित संस्थांची कसून चौकशी करण्याची गरज आहे.

पवन मुंजाल आणि हिरोमोटोकाॅर्प

पवन मुंजाल मोटार सायकल आणि स्कूटरच्या जगातील सर्वात मोठी उत्पादक असलेल्या हीरो मोटोकाॅर्पचे कार्यकारी अध्यक्ष आणि पूर्णवेळ संचालक आहेत. पवन मुंजालच्या कारकार्दीत हिरो मोटोकाॅर्पने २००१ मध्ये टू व्हिलर क्षेत्रात नाव कमावले. गेल्या २२ वर्षांपासून कंपनीने बाजारपेठेत आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. हिरो मोटोकाॅर्प सध्या आशिया, आफ्रिका, लॅटिन अमेरिका, मध्य पूर्वच्या ४७ पेक्षा अधिक देशांमध्ये आपले उत्पादन विक्री करतात. कंपनीजवळ ८ उत्पादन प्रकल्प आहे. यातील सहा भारतात आणि एक एक कोलंबिया आणि बांग्लादेशात आहेत.

विभाग