Economic Survey 2023 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनात आर्थिक सर्वेक्षण सादर केले. सर्वेक्षणात आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर (जीडीपी) ६.५% दराने वाढेल, असा अंदाज आहे. गेल्या ३ वर्षातील ही सर्वात कमी वाढ असेल. तर नाॅमिनल जीडीपी अंदाजे ११% आहे. आर्थिक वर्ष २०२३ साठी रिअल जीडीपीचा अंदाज ७% आहे. कोविड काळातील नकारात्मक वाढीच्या अंदाजानंतर सगळ्यात कमी वेगाने अर्थव्यवस्थेची वाढ २०२३-२४ या वर्षासाठी नोंदवण्यात आली आहे.
भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था राहणार असल्याचे सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे. सर्वेक्षणानुसार, भारत ग्राहक खरेदी संवेदनशीलचेच्या (पीपीपी) दृष्टीने जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे आणि विनिमय दराच्या बाबतीत पाचव्या क्रमांकावर आहे.
आर्थिक सर्वेक्षणातील महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे
- अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर २०२३-२४ साठी ६.५ टक्के राहण्याचा अंदाज, आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये तो ८.७ टक्क्यांच्या तुलनेत ७ टक्के राहण्याचा अंदाज
- जागतिक पटलावर भारत सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था
- कोरोनानंतर अर्थव्यवस्था पूर्वपदावपर वेगाने, देशांतर्गत मागणीत वाढ, गुंतवणूकीत वाढ
- पीपीपीच्या संदर्भात भारत तिसरी सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था, विनिमय दरात पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था
- कोरोना काळात अर्थव्यवस्थेने जे हरवले ते आज पुन्हा मिळवले आहे. ज्या क्षेत्राची गती मंदावली होती ती आज परत मिळाली आहे.
- जागतिक आर्थिक, राजनितीक विकासाच्या आधारावर पुढील आर्थिक वर्षात वास्तविक सकल जीडीपी वृद्धी दर ६ ते ६.८ टक्के राहण्याचा अंदाज
- अमेरिकन केंद्रीय बँकेद्वारे व्याजदराच्या चढ उतारांवर रुपयांवरील परिणाम दिसत आङे.
- इतर अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्थेसमोर आव्हाने वेगळ्या प्रकारची आहेत.
- आंतरराष्ट्रीय पातळीवर घटत्या व्यापाराच्या प्रमाणामुळे चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत निर्यातीत घट झाली
- पीएम किसान, पीएम गरीब कल्याण योजनांसारख्या सरकारी योजनांना अधिक प्रोत्साहन दिले आहे.
- चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत केंद्र सरकारच्या कॅपेक्समध्ये ६३.४ टक्के वाढ
अर्थव्यवस्था रिकव्हरीच्या स्थितीत - नागेश्वरनल, मुख्य आर्थिक सल्लागार
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केल्यानंतर मुख्य आर्थिक सल्लागार (सीईए) व्ही अनंथा नागेश्वरन म्हणाले की, कोरोना महामारीमुळे झालेल्या नुकसानातून अर्थव्यवस्था उभी राहिली आहे. चालू आर्थिक वर्षात विकास दर ७% राहण्याचा अंदाज आहे. आर्थिक वर्ष २०२३- २४ मध्ये जीडीपी वाढ ६-६.८% दरम्यान असू शकते.
संबंधित बातम्या