Ducati Bikes: डुकाटी स्ट्रीटफायटर व्ही ४ आणि डुकाटी स्ट्रीटफायटर व्ही ४ एस भारतात लॉन्च!-ducati streetfighter v4 and ducati streetfighter v4 s launched in india ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Ducati Bikes: डुकाटी स्ट्रीटफायटर व्ही ४ आणि डुकाटी स्ट्रीटफायटर व्ही ४ एस भारतात लॉन्च!

Ducati Bikes: डुकाटी स्ट्रीटफायटर व्ही ४ आणि डुकाटी स्ट्रीटफायटर व्ही ४ एस भारतात लॉन्च!

Mar 12, 2024 11:08 PM IST

Ducati Streetfighter V4 Launched in India: डुकाटी इंडियाने भारतीय बाजारात त्यांच्या दोन नव्या बाईक लॉन्च केल्या आहेत.

Ducati Streetfighter V4 S is offered in two colour schemes.
Ducati Streetfighter V4 S is offered in two colour schemes.

Ducati Bikes: डुकाटी इंडियाने स्ट्रीटफायटर व्ही ४ आणि स्ट्रीटफायटर व्ही ४ एस भारतीय बाजारात लॉन्च केल्या. स्ट्रीटफायटर व्ही ४ ची किंमत २४.६२ लाख रुपये आहे. तर, व्ही 4 एसची किंमत (डुकाटी रेड) २७.८० लाख रुपये आहे. तर, ग्रे नीरो कलरची किंमत २८ लाख रुपये आहे. सर्व किंमती एक्स-शोरूम आहेत. या बाईकची स्पर्धा बीएमडब्ल्यू एस १००० आरआर आणि कावासाकी झेड एच २ शी असेल.

दोन्ही मोटारसायकलींमध्ये १,१०३ सीसीचे डेस्मोसिडिसी स्ट्रॅडेल इंजिन वापरण्यात आले आहे. हे इंजिन १३,००० आरपीएमवर २०५ बीएचपी पॉवर आणि ९,५०० आरपीएमवर १२३ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. इंधन टाकी २०२२ च्या पानिगेल व्ही ४ सोबत सामायिक करण्यात आली आहे. त्यामुळे आता क्षमता १६.५ लिटर इतकी आहे. 

याशिवाय, बाजूंना नवीन साइड कव्हर देण्यात आले आहेत. डुकाटी नवीन 'वेट' राइडिंग मोड देखील ऑफर करत आहे आणि व्ही 4 एस मॉडेलमध्ये लिथियम-आयन बॅटरी मिळते जी १.७ किलो लाइटर आहे. इंस्ट्रूमेंट क्लस्टरवरील ग्राफिक्स सुधारित केले आहेत. स्ट्रीटफायटर व्ही ४ एस मध्ये स्मार्टईसी २.० इंटरफेससह सेमी- अ‍ॅक्टिव्ह ओहलिन्स सस्पेंशन आहे. 

OnePlus: भारतात धुमाकूळ घालायला येतोय वनप्लसचा 'हा' फोन; २५ हजारांत मिळणार धमाकेदार फीचर्स!

स्ट्रीटफायटर व्ही ४ पानिगेल व्ही ४ वर आधारित आहे. डुकाटी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक बिपुल चंद्रा म्हणाले, "नवीन एमवाय २३ स्ट्रीटफायटर व्ही ४ हे पानिगेल व्ही ४ च्या उत्क्रांतीवर आधारित आहे, जे गेमचेंजर सिद्ध झाले आहे. या दोन्ही बाईक भारतीय लोकांसमोर आणण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत.

विभाग