ड्रोन बनविणाऱ्या कंपनीची अमेरिकन कंपनीशी मोठी डील, शेअर घेण्यासाठी लागली रीघ
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  ड्रोन बनविणाऱ्या कंपनीची अमेरिकन कंपनीशी मोठी डील, शेअर घेण्यासाठी लागली रीघ

ड्रोन बनविणाऱ्या कंपनीची अमेरिकन कंपनीशी मोठी डील, शेअर घेण्यासाठी लागली रीघ

Dec 05, 2024 06:43 PM IST

Zen Tech Share Price : झेन टेक्नॉलॉजीजनं अमेरिकेच्या एव्हीटी सिम्युलेशनसोबत केलेल्या करारामुळे या कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार वाढ झाली आहे.

पंजाब सीमेवर ड्रोनची घुसखोरी वाढली, पण जम्मूत आंतरराष्ट्रीय सीमेवर कमी झाली, असे बीएसएफने म्हटले आहे.
पंजाब सीमेवर ड्रोनची घुसखोरी वाढली, पण जम्मूत आंतरराष्ट्रीय सीमेवर कमी झाली, असे बीएसएफने म्हटले आहे.

Share Market Updates Today : ड्रोन बनवणाऱ्या झेन टेक्नॉलॉजीज या कंपनीनं अमेरिकन कंपनीसोबत मोठा करार केला आहे. या व्यवहाराची बातमी येताच झेन टेक्नॉलॉजीजचा शेअर गुंतवणूकदारांची अक्षरश: झुंबड उडाली. परिणामी आठवड्याच्या चौथ्या दिवशी गुरुवारी कंपनीचा शेअर ३ टक्क्यांनी वधारला आणि किंमत १९०० रुपयांवर पोहोचली. व्यवहाराअंती हा शेअर १८८९.५० रुपयांवर होता.

आदल्या दिवसाच्या तुलनेत आज झेन टेकच्या शेअरमध्ये २.८२ टक्क्यांची वाढ झाली. २४ जानेवारी २०२४ रोजी हा शेअर ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर ६८७.७० रुपयांवर होता. १५ ऑक्टोबर २०२४ रोजी तो १९९८.८० रुपयांवर गेला. शेअरचा हा ५२ आठवड्यांचा उच्चांक आहे. 

शेअरमधील तेजीची कारणं काय?

अमेरिकेच्या संरक्षण बाजारात धोरणात्मक पावलं करत असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. कंपनीनं अमेरिकेतील एव्हीटी सिम्युलेशनसोबत करार केला आहे. एव्हीटी सिम्युलेशनला सिम्युलेशनचा २५ वर्षांहून अधिक अनुभव आहे, असं कंपनीनं म्हटलं आहे. अमेरिकेत सर्वसमावेशक, किफायतशीर प्रशिक्षण प्लॅटफॉर्मची मागणी वाढली आहे. ड्रोनविरोधी यंत्रणा, एआय-संचालित प्लॅटफॉर्म आणि सिम्युलेशनवर लक्ष केंद्रित करून गेल्या पाच वर्षांत अमेरिकेनं भारतीय संरक्षण तंत्रज्ञानाची आयात २.८ अब्ज डॉलर्सच्या पुढं नेली आहे.

अलीकडंच झेन टेकनं एआय-संचालित रोबोटिक सोल्यूशन्स लाँच करण्याबरोबरच आपल्या टँक कंटेनराइज्ड क्रू गनरी सिम्युलेटर आणि इन्फंट्री व्हर्च्युअल ट्रेनिंग सिम्युलेशन सिस्टम (आयव्हीटीएसएस) साठी पेटंट मिळवलं आहे.

एक्सपर्ट्स शेअरबद्दल काय म्हणतात?

भारतातील संरक्षण क्षेत्राचा विस्तार होत असल्याकडं लक्ष वेधत नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीजनं झेन टेक्नॉलॉजीजसाठी टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. याची टार्गेट प्राइस २२०० रुपये निश्चित करण्यात आली आहे. नुवामानं आर्थिक वर्ष २०२४-२७ पर्यंत ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन (OPM) ३३ ते ३५ टक्के आणि सीएजीआर ३६ टक्क्यांहून अधिक राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

३१ मार्चपर्यंत १४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त ऑर्डर बुक असलेल्या झेन टेकला आर्थिक वर्ष २०२५ मध्ये सातत्यपूर्ण वाढ होण्याची अपेक्षा आहे. ९०० कोटी रुपयांच्या विक्रीचा टप्पा ओलांडण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner