
फूड डिलिव्हरी फर्म झोमॅटोचे (Zomato) डिलिव्हरीचे सह-संस्थापक दीपिंदर गोयल (Deepinder Goyal) यांच्याबाबत एक मोठा खुलासा झाला आहे. एवढ्या मोठ्या कंपनीची धुरा सांभाळतानाच ते किमान ३ महिन्यातून एकदा होम डिलिव्हरी करतात. यासाठी ते कंपनीचा ट्रेडमार्क असलेला लाल टी शर्ट घालून डिलिव्हरी करतात. मात्र आजपर्यंत त्यांना कोणीही ओळखू शकलेलं नाही.
त्यांच्या संदर्भातील ही माहिती Naukri.com चे मालक संजीव बिखचंदानी यांनी एक ट्विटद्वारे दिली आहे. संजीव बिखचंदानी म्हणतात की, ‘नुकतेच मी झोमॅटोचे संस्थापक दिपिंदर गोयल आणि त्यांच्या संपूर्ण टीमला भेटलो. दीपंदरसह सर्व वरिष्ठ व्यवस्थापक लाल रंगाचा झोमॅटो टी-शर्ट घालून, बाईकवरून दिवसभर फूडची डिलिव्हरी करतात, याचं मला कौतुक वाटतं. यात दिपिंदर स्वत: साधारण 3 महिन्यातून एकदा सर्वसाधारण मोटरबाईकवर बसून संपूर्ण शहरात फूड डिलिव्हरी करतात. त्यामुळे अशाप्रकारे पुढच्या वेळी तुमच्या घरी झोमॅटो डिलिव्हरी एजंट आल्यास त्याच्याकडे निरखून पहा, कदाचित तो कंपनीचा सीईओ असू शकतो.
दरम्यान, झोमॅटोचा फूड कार्निव्हल नोव्हेंबरमध्ये सुरू होत आहे. झोमॅटो नोव्हेंबरमध्ये देशात फूड आणि एंटरटेनमेंट कार्निव्हल 'झोमॅलँड' पुन्हा आयोजित करण्यासाठी सज्ज आहे. कोरोना विषाणूच्या साथीमुळे गेल्या दोन वर्षांपासून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला नव्हता. झोमॅटोच्या या झोमलँड सीझनमध्ये सुमारे ४०० रेस्टॉरंट्स सहभागी होत आहेत.
या कार्निव्हलमध्ये उत्तम खाद्यपदार्थांची रेलचेल असणार आहे. यासोबतच मजेदार खेळही असतील. 'झोमलँड स्पर्धा पुणे, मुंबई, अहमदाबाद, नवी दिल्ली, हैदराबाद, बेंगळुरू आणि कोलकाता येथे होणार आहे. हा कार्यक्रम नोव्हेंबर २०२२ मध्ये सुरू होईल, जो फेब्रुवारी २०२३ पर्यंत चालणार आहे.
संबंधित बातम्या
