ITR filing : मुदत संपली असली तरी दंडाशिवाय भरता येईल इन्कम टॅक्स रिटर्न! कोणाला मिळते ही सूट? वाचा!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  ITR filing : मुदत संपली असली तरी दंडाशिवाय भरता येईल इन्कम टॅक्स रिटर्न! कोणाला मिळते ही सूट? वाचा!

ITR filing : मुदत संपली असली तरी दंडाशिवाय भरता येईल इन्कम टॅक्स रिटर्न! कोणाला मिळते ही सूट? वाचा!

Aug 01, 2024 11:01 AM IST

ITR Filing 2024 : इन्कम टॅक्स विवरणपत्र दाखल करण्याची ३१ जुलैची मुदत संपली असली तरी काही करदात्यांना कोणत्याही दंडाशिवाय विवरणपत्र दाखल करता येणार आहे.

ITR filing : मुदत संपली असली तरी दंडाशिवाय भरता येईल इन्कम टॅक्स रिटर्न! कसं? वाचा!
ITR filing : मुदत संपली असली तरी दंडाशिवाय भरता येईल इन्कम टॅक्स रिटर्न! कसं? वाचा!

ITR Filing 2024 : प्राप्तिकर विवरण पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै कालच संपली. सर्वसाधारणपणे, या मुदतीनंतर इन्कम टॅक्स रिटर्न भरणाऱ्यांना दंड भरावा लागतो. शिवाय, त्यांचं इतर प्रकारेही नुकसान होतं. मात्र, काही करदात्यांना अजूनही कोणताही दंड न भरता आयटीआर दाखल करण्याची संधी आहे.

आर्थिक वर्ष २०२३-२४ (मूल्यांकन वर्ष २०२४-२५) साठी विलंबित विवरणपत्र दाखल करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२४ आहे. प्राप्तिकर विभागानं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या पोस्टनुसार, ३१ जुलैपर्यंत ७ कोटींहून अधिक आयटीआर दाखल करण्यात आले आहेत, त्यापैकी काल संध्याकाळी ७ वाजेपर्यंत ५० लाखांहून अधिक आयटीआर दाखल करण्यात आले आहेत.

मागील वर्षी, म्हणजेच ३१ जुलै २०२३ रोजी दाखल करण्यात आलेल्या एकूण आयटीआरची संख्या ६.७७ कोटींपेक्षा जास्त होती, ३१ जुलै २०२३ रोजी एका दिवशी ६४.३३ लाखांहून अधिक आयटीआर दाखल करण्यात आले होते.

नियम काय सांगतो?

नियमानुसार, उशिरा आयटीआर भरल्यास कलम २३४ एफ अंतर्गत विलंब शुल्क आकारलं जातं. जर तुमचं एकूण उत्पन्न ५ लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर ५ हजार रुपये विलंब शुल्क भरावं लागतं. जर तुमचं एकूण उत्पन्न ५ लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर १ हजार रुपये विलंब शुल्क द्यावं लागतं. अशा परिस्थितीत तुम्हाला ना इन्कम टॅक्स रिफंड मिळतो ना त्यावरील व्याज मिळतं.

३१ जुलै नंतरही दंड नाही!

इकॉनॉमिक टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, काही प्रकरणामध्ये ३१ जुलै २०२४ नंतर जरी विवरणपत्र दाखल केलं तरी दंड आकारला जात नाही. काही करदात्यांसाठी आयटीआर भरण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २०२४ आहे. ज्यांचं एकूण करपात्र उत्पन्न मूळ सूट मर्यादेपेक्षा कमी असतं त्यांना ही सवलत मिळते. करपात्र उत्पन्न नसतानाही स्वेच्छेनं जे प्राप्तिकर विवरणपत्र भरतात असे हे लोक असतात. लेखापरीक्षण (Audit) आवश्यक असलेल्या करदात्यासाठी आयटीआर भरण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २०२४ आहे.

विलंबित आयटीआर कधी भरावा?

आयटीआर भरणं आवश्यक होतं, परंतु मुदतीच्या ते भरता आलं नाही, अशा लोकांनी विलंबित आयटीआर भरणे आवश्यक आहे. इन्कम टॅक्स ऑडिटची गरज नसलेल्या व्यक्तींसाठी आयटीआर भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२४ आहे.

Whats_app_banner