गुगलसाठी स्मार्टफोन बनविणाऱ्या कंपनीनं एका वर्षात मिळवून दिला १८० टक्के नफा, आजही वाढला भाव
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  गुगलसाठी स्मार्टफोन बनविणाऱ्या कंपनीनं एका वर्षात मिळवून दिला १८० टक्के नफा, आजही वाढला भाव

गुगलसाठी स्मार्टफोन बनविणाऱ्या कंपनीनं एका वर्षात मिळवून दिला १८० टक्के नफा, आजही वाढला भाव

HT Marathi Desk HT Marathi
Dec 02, 2024 05:44 PM IST

Dixon Technology Share price : डिक्सन टेक्नॉलॉजीजच्या शेअरची किंमत ६.५% वाढून १६,८३६.६५ रुपयांवर पोहोचली आहे. या तेजीमागे नेमकं काय आहे कारण?

1 वर्षात 180% परतावा, गुगलसाठी फोन बनवणारी कंपनी, आज पुन्हा वाढली किंमत
1 वर्षात 180% परतावा, गुगलसाठी फोन बनवणारी कंपनी, आज पुन्हा वाढली किंमत

Share Market marathi news : लोकप्रिय कंपनी डिक्सन टेक्नॉलॉजीच्या शेअर्सच्या किंमतीत आज तेजी पाहायला मिळाली. सोमवारी बीएसईवर कंपनीचा शेअर ६.५ टक्क्यांनी वधारून १६,८३६.६५ रुपयांवर पोहोचला. कंपनीच्या शेअरचा हा आतापर्यंतचा उच्चांक आहे.

कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्यामागे एक महत्त्वाचं कारण आहे. डिक्सनची उपकंपनी पॅडजेट इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेटनं कॉम्पलसोबत भागीदारीत गुगल पिक्सल स्मार्टफोनचं उत्पादन सुरू केलं आहे. कंपनी गुगलच्या भारतीय युनिटसाठी याची निर्मिती करत आहे. हे उत्पादन सेक्टर ६८ नोएडामध्ये केलं जात आहे, अशी माहिती कंपनीनं एक्सचेंजला दिली आहे.

येत्या काही महिन्यांत कंपनी आपल्या पोर्टफोलिओमध्ये ग्लोबल ब्रँड जोडण्याचा प्रयत्न करत आहे. गुगल पिक्सलची किंमत ३२,००० रुपयांपासून १,७२,००० रुपयांपर्यंत आहे.

तज्ज्ञांचा अंदाज काय?

बिझनेस स्टँडर्डच्या अहवालानुसार, डिक्सन टेक्नॉलॉजीज कंपनी नोमुरा तेजीत आहे. ब्रोकरेज हाऊसचा असा विश्वास आहे की आर्थिक वर्ष २०२७ पर्यंत कंपनी ४७ दशलक्ष फोन तयार करण्याचं उद्दिष्ट साध्य करेल. हे प्रमाण देशांतर्गत मागणीच्या ३० टक्के असेल. नोमुरानं डिक्सनला 'बाय' रेटिंग दिलं आहे. ब्रोकरेज हाऊसनं या शेअरसाठी १८,६५४ रुपयांचं टार्गेट प्राइस निश्चित केलं आहे.

शेअर बाजारातील एकंदर कामगिरी कशी?

गेल्या ६ महिन्यांत कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत ७८.०५ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर, २०२४ मध्ये शेअरच्या किंमतीत १५९.५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. एका वर्षात कंपनीनं पोझिशनल गुंतवणूकदारांना १८१ टक्के परतावा दिला आहे.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner