दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर खरेदी करा 'हे' १० शेअर, मिळवून देऊ शकतात ५० टक्क्यांपर्यंत नफा
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर खरेदी करा 'हे' १० शेअर, मिळवून देऊ शकतात ५० टक्क्यांपर्यंत नफा

दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर खरेदी करा 'हे' १० शेअर, मिळवून देऊ शकतात ५० टक्क्यांपर्यंत नफा

HT Marathi Desk HT Marathi
Published Oct 31, 2024 10:53 AM IST

Diwali Stocks Picks : दिवाळीच्या सणानिमित्त शेअर मार्केटमधील तज्ज्ञांनी काही खास स्टॉक्स सुचवले आहेत. पुढील दिवाळीपर्यंत हे स्टॉक्स ४० टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतात, असं तज्ज्ञांचं मत आहे.

दिवाळी शेअर ्स 2024: पुढील दिवाळीपर्यंत हे 10 शेअर्स तुम्हाला बनवू शकतात श्रीमंत
दिवाळी शेअर ्स 2024: पुढील दिवाळीपर्यंत हे 10 शेअर्स तुम्हाला बनवू शकतात श्रीमंत

Stock Market Today : देशभरात सध्या दिवाळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. अनेक कार्यालयं, शाळा-महाविद्यालयं बंद असली तरी शेअर बाजार सुरू आहे. सणाच्या या पार्श्वभूमीवर आज मार्केट विश्लेषकांनी खास १० शेअर्सची शिफारस केली आहे. 

तज्ज्ञांनी शिफारस केलेल्या या शेअर्समध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, गार्डन रिच शिपबिल्डर्स, फाइव्ह स्टार बिझनेस फायनान्स लिमिटेड, प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड, कॉम्प्युटर एज मॅनेजमेंट, मुंजाल ऑटो इंडस्ट्रीज लिमिटेड, नॅशनल अ‍ॅल्युमिनियम इंडस्ट्रीज, गरवारे टेक्निकल फायबर, देवयानी इंटरनॅशनल आणि डिव्हिस लॅब यांचा समावेश आहे.

केडिया अ‍ॅडव्हायजरीचे अध्यक्ष अजय केडिया यांनी या शेअर्सची खरेदी सुचवताना त्यांची खरेदी किंमत आणि टार्गेट प्राइस दिली आहे. कोणता शेअर कोणत्या दरानं घ्यायचा आणि टार्गेट प्राइस किती असावं? पाहूया…

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) : हा शेअर ७९५ रुपयांना खरेदी करा, १२४० रुपये टार्गेट प्राइस ठेवा. पुढील दिवाळीपर्यंत ५५.९७ टक्के परतावा मिळू शकतो.

गार्डन रिच शिपबिल्डर्स : गार्डन रिच शिपबिल्डर्स २५०० रुपयांच्या टार्गेट प्राइससह १६६० रुपयांना खरेदी करा. पुढील दिवाळीपर्यंत ५०.६० टक्क्यांपर्यंत परतावा मिळण्याची अपेक्षा आहे.

फाइव्ह स्टार बिझनेस फायनान्स लिमिटेड : 845 रुपयांत खरेदी करा, 1250 रुपयांचे टार्गेट ठेवा. दिवाळी २०२५ मध्ये ४७.९३ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे.

प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड : ७५० रुपयांना खरेदी करा. ११०० रुपयांचे लक्ष्य ठेवा. येत्या दिवाळीपर्यंत ४६ टक्क्यांहून अधिक परतावा मिळू शकतो.

कॉम्प्युटर एज मॅनेजमेंट : ४४८० वर खरेदी करा, ६५०० चे टार्गेट ठेवा. पुढील दिवाळीपर्यंत ४५ टक्क्यांहून अधिक परतावा मिळण्याची अपेक्षा आहे.

मुंजाल ऑटो इंडस्ट्रीज लिमिटेड : मुंजाल ऑटोमध्ये १३२.५० रुपयांत प्रवेश घ्यावा. लक्ष्य किंमत १९० ठेवावी. म्हणजेच पुढील दिवाळीपर्यंत त्यात ४३.४० टक्के वाढ होऊ शकते.

नॅशनल अ‍ॅल्युमिनियम इंडस्ट्रीज : या शेअरमध्ये २२५ रुपयांत गुंतवणूक करा, ३२० रुपयांचे टार्गेट ठेवा. ४२ टक्क्यांपेक्षा जास्त परताव्याची अपेक्षा करता येईल.

गरवारे टेक्निकल फायबर : ४१०० रुपयांत प्रवेश घ्या, ५७०० रुपयांचे टार्गेट ठेवा. वर्षभरात सुमारे ३९ टक्के परताव्याची अपेक्षा आहे.

देवयानी इंटरनॅशनल:  हा शेअर १६७ रुपयांना खरेदी करा, २२५ चे लक्ष्य ठेवा. पुढील दिवाळीपर्यंत तो वाढून ३४.३३ टक्के होईल, असा अंदाज आहे.

डिव्हिस लॅब : ५८५० रुपयांत खरेदी करून या शेअरमध्ये प्रवेश करा आणि ७६०० रुपयांचे टार्गेट ठेवा. येत्या दिवाळीपर्यंत ३० टक्के परतावा मिळू शकतो.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner