मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Diwali offer on Air vistara : दिवाळीसाठी एअर विस्ताराची बंपर सवलत,जाणून घ्या

Diwali offer on Air vistara : दिवाळीसाठी एअर विस्ताराची बंपर सवलत,जाणून घ्या

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Oct 19, 2022 12:02 PM IST

Diwali offer on Air vistara : दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही या सणासुदीच्या काळात विमानाने प्रवास करण्याचा विचार करत असाल तर एअर विस्ताराने तुमच्यासाठी एक उत्तम ऑफर दिली आहे.

Flight takoff HT
Flight takoff HT

दिवाळीच्या सुट्टीत फिरायला जाण्याचा विचार करत आहात ?  प्रवासाच्या खर्चाचं टेन्शन घेऊ नका. बिनधास्तपणे विमानाने प्रवास करता येणार आहे. कारण एअर विस्ताराने तुमच्यासाठी एक उत्तम ऑफर दिली आहे. कंपनीने ही ऑफर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही प्रवासांवर दिली आहे. या संपूर्ण ऑफरबद्दल तपशीलवार माहिती पुढीलप्रमाणे -

कंपनीच्या यासंदर्भात ट्विट केले आहे. त्यानुसार "भारताच्या सर्वोत्कृष्ट एअरलाइनसह भारताच्या सौंदर्याचा आनंद घ्या! आमच्या सणासुदीच्या विक्रीचा लाभ घ्या आणि रु.१४९९ मध्ये वन वे डोमेस्टिक फ्लाइट मिळवा. आम्ही तुम्हाला सांगतो, ही ऑफर फक्त १९ ऑक्टोबरपर्यंत आहे. ग्राहक २३ ऑक्टोबर ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत कोणत्याही देशांतर्गत फ्लाइटवर या ऑफरचा लाभ घेऊ शकतात.

कंपनी परदेशात जाणाऱ्या लोकांनाही जोरदार ऑफर देत आहे. कंपनीच्या ट्विटनुसार, ग्राहकांना २० ऑक्टोबरपर्यंत आंतरराष्ट्रीय उड्डाणे बुक करून विक्रीचा लाभ मिळेल. २३ ऑक्टोबर ते ३१ मार्च २०२३ पर्यंत कोणत्याही तारखेसाठी प्रवासी हे तिकीट बुक करू शकतात. म्हणजेच ज्यांच्याकडे आधीच प्लान आहे ते या ऑफरचा फायदा घेऊ शकतात. कंपनीच्या संकेतस्थळावर नोंद करुनही बुकिंग करता येऊ शकते. 

जाणून घ्या किती सूट -

इकॉनॉमी क्लासमध्ये एकेरी देशांतर्गत प्रवास रु.१४९९, प्रीमियम इकॉनॉमी क्लास- रु.२९९९ आणि बिझनेस क्लास- रु.८९९९ पासून सुरू होतो.

दिल्ली ते काठमांडू प्रवास इकॉनॉमी क्लासमध्ये रु.१४,१४९ , प्रीमियम क्लासमध्ये रु.१८४९९ , बिझनेस क्लासमध्ये रु. ४२,४९९ मध्ये करता येतो.

WhatsApp channel

विभाग