शेअर बाजाराला दिवाळीची सुट्टी नेमकी कधी? गुरुवारी की शुक्रवारी? जाणून घ्या!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  शेअर बाजाराला दिवाळीची सुट्टी नेमकी कधी? गुरुवारी की शुक्रवारी? जाणून घ्या!

शेअर बाजाराला दिवाळीची सुट्टी नेमकी कधी? गुरुवारी की शुक्रवारी? जाणून घ्या!

HT Marathi Desk HT Marathi
Published Oct 30, 2024 04:36 PM IST

Stock Market Diwali Holiday : दिवाळीच्या निमित्तानं शेअर बाजार किती दिवस बंद राहणार आहे आणि ते दिवस कोणते आहेत? जाणून घेऊया…

शेअर बाजारात दिवाळीची सुट्टी नेमकी कधी? गुरुवारी की शुक्रवारी? पाहा यादी
शेअर बाजारात दिवाळीची सुट्टी नेमकी कधी? गुरुवारी की शुक्रवारी? पाहा यादी (PTI)

share market holiday : सण-उत्सवांचा राजा समजला जाणारा दिवाळीचा सण देशभरात सुरू झाला आहे. देशभरात दिवाळीची धामधूम आहे. मात्र, यंदा ऐन दिवाळीत ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर या दिवशी अमावस्या असल्यामुळं लक्ष्मीपूजन कधी करायचं याविषयी संभ्रम आहे. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची स्थितीही तशीच आहे. भारतीय शेअर बाजार ३१ ऑक्टोबरला नेहमीप्रमाणे खुला राहणार असून १ नोव्हेंबरला दिवाळीची सुट्टी असणार आहे.

शेअर बाजारातील सुट्ट्यांविषयी जाणून घेण्यासाठी लोकांनी बीएसई वेबसाइट - bseindia.com ला भेट देऊन वरील 'ट्रेडिंग हॉलिडेज' पर्यायावर क्लिक करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. 'ट्रेडिंग हॉलिडेज' या पर्यायावर क्लिक केल्यानंतर २०२४ मधील शेअर बाजाराच्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी समोर येईल. शेअर बाजाराच्या सुट्ट्यांच्या या यादीमध्ये ऑक्टोबर २०२४ मध्ये फक्त एक सुट्टी आहे. महात्मा गांधी जयंती दिनी २ ऑक्टोबरला ती सुट्टी होती. याशिवाय या महिन्यात एकही सुट्टी नाही.

नोव्हेंबरमध्ये शेअर बाजाराच्या सुट्ट्या

शेअर बाजारात महात्मा गांधी जयंतीनंतरची पुढची सुट्टी १ नोव्हेंबर २०२४ ला आहे. म्हणजेच उद्या भारतीय शेअर बाजार खुला राहणार आहे. दिवाळीसाठी भारतीय शेअर बाजाराची सुट्टी या आठवड्यात १ नोव्हेंबर २०२४ किंवा शुक्रवारी आहे. करन्सी आणि डेरिव्हेटिव्ह सेगमेंटमधील ट्रेडिंग १ नोव्हेंबर २०२४ रोजी बंद राहणार आहे. मात्र, या दिवशी एक तासाचा विशेष दिवाळी मुहूर्त ट्रेडिंग होणार आहे. 

कमॉडिटी डेरिव्हेटिव्ह सेगमेंटमधील ट्रेडिंग आणि इलेक्ट्रॉनिक गोल्ड पावती सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत बंद राहतील. सायंकाळी पाच वाजता पुन्हा व्यवहार सुरू होतील. याशिवाय १५ नोव्हेंबर २०२४ रोजी गुरु नानक जयंतीनिमित्त देखील बाजार बंद राहणार आहे.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner