Dividend Stock : लाभांश देणाऱ्या कंपन्यांचे शेअर खरेदी करायचा विचार असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. पेज इंडस्ट्रीजनं घसघशीत लाभांश देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार एका शेअरवर २५० रुपये डिविडंड दिला जाणार आहे.
पेज इंडस्ट्रीजकडून गुंतवणूकदारांना लाभांश दिला जाण्याची गेल्या ६ महिन्यांतील ही तिसरी वेळ आहे. याआधी कंपनीनं याच वर्षात मे आणि ऑगस्टमध्ये लाभांश दिला होता. त्यानंतर आता पुन्हा लाभांश दिला जात आहे. त्यासाठी १४ नोव्हेंबर २०२४ ही रेकॉर्ड डेट जाहीर करण्यात आली आहे. म्हणजेच या आठवड्यात गुरुवारी ज्या गुंतवणूकदारांकडे कंपनीचे शेअर्स असतील, त्यांना एका शेअरवर २५० रुपयांचा नफा मिळणार आहे.
कंपनीनं या कॅलेंडर वर्षात ३ वेळा डिविडंड दिला आहे. फेब्रुवारी महिन्यात कंपनीनं पात्र गुंतवणूकदारांना प्रति शेअर १०० रुपये लाभांश दिला होता. मे आणि ऑगस्टमध्ये अनुक्रमे ३०० रुपये आणि २५० रुपये लाभांश दिला होता.
शुक्रवारी बीएसईवर कंपनीचा शेअर जवळपास ७ टक्क्यांनी घसरून ४७९८७.८० रुपयांवर बंद झाला. गेल्या वर्षभरात लाभांश देणाऱ्या या मोठ्या शेअरच्या किमतीत २६ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. तर शेअरच्या किंमतीत १० वर्षांत ४२० टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ४८३०१ रुपये आणि ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर ३३१०० रुपये आहे. कंपनीचे मार्केट कॅप ५३५२४.९९ कोटी रुपये आहे.