मराठी बातम्या  /  Business  /  Divgi Torqtransfer Systems Ipo Price Band Fixed 560 To 590 Rupees Gmp Surges 60 Rupees

IPO : १ मार्चला येतोय हा आयपीओ, प्राईस बँडची घोषणा, टाटा महिंद्राकडून मागणी

IPO HT
IPO HT
Kulkarni Rutuja Sudeep • HT Marathi
Feb 27, 2023 07:34 PM IST

IPO : जर तुम्ही आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी महत्त्वाची. या आठवड्यात १ मार्चला आॅटो कंम्पोनंट बनवणाऱ्या दिव्गी टॉर्कट्रान्सफर सिस्टिम्स लिमिटेडचा आयपीओ येत आहे. जाणून घ्या या आयपीओबद्दल -

IPO : जर तुम्ही आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी महत्त्वाची. या आठवड्यात १ मार्चला आॅटो कंम्पोनंट बनवणाऱ्या दिव्गी टॉर्कट्रान्सफर सिस्टिम्स लिमिटेडचा आयपीओ येत आहे. नंदन नीलकेणी कुटूंबाचा पाठिंबा असलेल्या दिव्गी टॉर्कट्रान्सफर सिस्टिम्स लिमिटेडचा आयपीओ १ मार्च २०२३ पासून खुला होत आहे. गुंतवणूक त्यात ३ मार्चपर्यंत बोली लावू शकतात. तर अॅकर गुंतवणूकदार २८ फेब्रुवारीपर्यंत बोली लावू शकतात. या आयपीओचा प्राईस बँड ५६०-५९० रुपये प्रती इक्विटी शेअर्स निर्धारित करण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

ग्रे मार्केटमध्ये मागणी

दिव्गी टॉर्कट्रान्सफर सिस्टिम्स लिमिटेडला ग्रे मार्केटमध्ये चांगली मागणी आहे. ग्रे मार्केटमध्ये शेअर आज ६० रुपयांच्या प्रिमियमवर उपलब्ध आहे. ईश्यू प्राईसच्या तुलनेत तो ६५० रुपयांवर लिस्ट होऊ शकतो. दिव्गी टॉर्कट्रान्सफर सिस्टिम्स लिमिटेडच्या आयपीओमध्ये एक गुंतवणूकदार कमीतकमी २५ इक्विटी शेअर्ससाठी बोली लावू शकतो. हा शेअर १४ मार्चला एक्सचेंजवर लिस्ट होऊ शकतो.

गोष्ट हिस्सेदारांची

दिव्गी टॉर्कट्रान्सफर सिस्टिम्स लिमिटेडमध्ये ओमान इंडियाची २१.७१ टक्के हिस्सेदारी आहे. तर एनआरजेएनची ८.७१ टक्के आहे. भरत दिवगी, संजय दिग्गी आणि आशिष दिवगी यांच्या अनुक्रमे ०.७२ टक्के, ०.५९ टक्के आणि ०.७६ टक्के हिस्सेदारी आहे. याशिवाय अरुण इंदगुनजी आणि किशोर कलबाग यांच्याकडे ०.१६ टक्के हिस्सा आहे.

संबंधित बातम्या

विभाग