Layoffs : पुन्हा एकदा टाळेबंदी, मंनोरंजन क्षेत्रातील ही कंपनी ४००० कर्मचाऱ्यांना काढणार
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Layoffs : पुन्हा एकदा टाळेबंदी, मंनोरंजन क्षेत्रातील ही कंपनी ४००० कर्मचाऱ्यांना काढणार

Layoffs : पुन्हा एकदा टाळेबंदी, मंनोरंजन क्षेत्रातील ही कंपनी ४००० कर्मचाऱ्यांना काढणार

Published Mar 20, 2023 08:01 PM IST

Layoffs : आंतरराष्ट्रीय पातळीवर मनोरंजन क्षेत्रात आघाडीवर असलेल्या या कंपनीतून अंदाजे ४ हजार कर्मचाऱ्यांची कपात होणार आहे. याआधीही कंपनीने ७००० कर्मचाऱ्यांची कपात केली होती.

layoffs HT
layoffs HT

Layoffs : मनोरंजन उद्योग क्षेत्रातील नामांकित कंपनी डिस्नेने पुन्हा एकदा कर्मचाऱी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसात कंपनी ४ हजार कर्मचाऱ्यांना घरी बसवू शकते. याआधी कंपनीने फेब्रुवारी महिन्यात ७ हजार कर्मचाऱ्यांची कपात केली होती. याचाच अर्थ, सलग दोन महिन्यात कंपनीने ११ हजार कर्मचाऱ्यांवर कर्मचारी कपातीचा बडगा उगारला आहे.

कंपनीने व्यवस्थापकांना त्यांच्या बजेटमध्ये कपात करण्याच्या तसेच कर्मचाऱ्यांच्या नावांची यादी करण्याच्या सुचना संबंधित विभागांना दिल्या आहेत. ही कर्मचारी कपात एकाच टप्प्यात अथवा वेगवेगळ्या टप्प्यात केली जाणार आहे याबाबत कंपनीकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. एप्रिलपर्यंत नोकऱ्या कपातीची घोषणा होण्याची अपेक्षा आहे. याशिवाय डिस्नेने प्रौढांसाठी जनरल एंटरटेनमेंट कमी करण्यात येणार असल्याचेही जाहीर केले आहे. यासोबतच हुलू या स्ट्रीमिंग सेवेचे काय करायचे याच्या पर्यायांचा विचार केला जाईल.

"या योजनेमुळे आम्हाला अधिक किफायतशीर पद्धतीने काम करता येईल आणि आमचा दृष्टीकोन समन्वित आणि पद्धतशीर असेल. विशेषत: या आव्हानात्मक आर्थिक वातावरणात आमचा व्यवसाय अधिक कार्यक्षमतेने चालवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. त्यामुळे संपूर्ण कंपनीमध्ये 5.5 अब्ज डॉलर वाचवण्याचे आमचे ध्येय आहे.", अशी प्रतिक्रिया कंपनीचे सीईओ बाँब इगर यांनी दिली आहे.

फेब्रुवारीत ७ हजार कर्मचारी कपात

 

फेब्रुवारीच्या सुरुवातीला डिस्नेचे सीईओ बॉब इगर यांनी ७००० कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची योजना जाहीर केली. या कपातीचा उद्देश पुनर्रचना, कन्टेंटमध्ये कपात आणि पगारात कपात करून अब्जावधी डॉलर्स वाचवणे हा होता. खेळ वगळता, फर्म पुढील काही वर्षांत सुमारे ३ अब्ज डॉलर बचतीची अपेक्षा करत आहे.

Whats_app_banner