IPO Listing : शेअर बाजारात लिस्ट होताच लागलं अप्पर सर्किट; पहिल्याच दिवशी शेअर २०० पार
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  IPO Listing : शेअर बाजारात लिस्ट होताच लागलं अप्पर सर्किट; पहिल्याच दिवशी शेअर २०० पार

IPO Listing : शेअर बाजारात लिस्ट होताच लागलं अप्पर सर्किट; पहिल्याच दिवशी शेअर २०० पार

Oct 04, 2024 12:31 PM IST

Diffusion Engineers shares ipo listing : डिफ्यूजन इंजिनिअर्सच्या शेअरने पहिल्या दिवशी २०० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. एनएसईवर कंपनीचा शेअर १९३.५० रुपयांवर लिस्ट झाला आहे.

डिफ्यूजन इंजीनियर्स के शेयर बीएसई में 188 रुपये पर लिस्ट हुए हैं।
डिफ्यूजन इंजीनियर्स के शेयर बीएसई में 188 रुपये पर लिस्ट हुए हैं।

IPO Listing : डिफ्यूजन इंजिनीअर्स या छोट्या कंपनीनं शेअर बाजारात अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. या कंपनीचे शेअर्स आज राष्ट्रीय शेअर बाजारात १५.१८ टक्के प्रीमियमसह १९३.५० रुपयांवर सूचीबद्ध झाले. लिस्टिंगनंतर काही वेळातच कंपनीच्या शेअरनं २०३.१७ रुपयांवर झेप घेतली आणि पहिल्याच दिवशी अप्पर सर्किट लागलं.

डिफ्यूजन इंजिनीअर्सचा शेअर बीएसईवर १८८ रुपयांवर सूचीबद्ध झाला. लिस्टिंगनंतर डिफ्यूजन इंजिनिअर्सचा शेअर ५ टक्क्यांनी वधारून १९७.३५ रुपयांवर पोहोचला. डिफ्यूजन इंजिनीअर्सचा एकूण पब्लिक इश्यू आकार १५८ कोटी रुपये होता.

आयपीओला मिळाला होता तुफान प्रतिसाद
डिफ्यूजन इंजिनिअर्सचा आयपीओ एकूण ११४.५० पट सब्सक्राइब झाला होता. आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा कोटा ८५.६१ पट सब्सक्राइब झाला होता. तर बिगर संस्थात्मक गुंतवणूकदार (NII) श्रेणीत हा आयपीओ २०७.६० पट सबस्क्राइब झाला होता. डिफ्यूजन इंजिनिअर्सच्या आयपीओला क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल बायर्स (QIB) श्रेणीत ९५.७४ पट सब्सक्रिप्शन मिळालं. क्युआयबीचा कोटा ९५.०५ पट सब्सक्राइब झाला होता.

डिफ्यूजन इंजिनिअर्सचा आयपीओ २६ सप्टेंबर २०२४ रोजी गुंतवणूकदारांसाठी खुला झाला आणि ३० सप्टेंबरपर्यंत खुला राहिला. कंपनीच्या आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदार कमीत कमी १ लॉट आणि जास्तीत जास्त १३ लॉटसाठी अर्ज करू शकत होते. आयपीओच्या एका लॉटमध्ये ८८ शेअर्स होते. म्हणजेच रिटेल गुंतवणूकदारांना कंपनीच्या आयपीओमध्ये किमान १४७८४ रुपयांची गुंतवणूक करावी लागली.

काय करते ही कंपनी?

डिफ्यूजन इंजिनीअर्सची स्थापना १९८२ साली झाली. कंपनी कोअर उद्योगांसाठी वेल्डिंग कंझ्युमेबल्स, वेअर प्लेट्स आणि पार्ट्स आणि अवजड मशिनरी तयार करते. कंपनी अवजड मशिनरी आणि उपकरणांसाठी विशेष दुरुस्ती आणि रिकंडिशनिंग सेवा पुरवते. डिफ्यूजन इंजिनिअर्सचे प्रवर्तक प्रशांत गर्ग, नितीन गर्ग आणि चित्रा गर्ग आहेत. आयपीओपूर्वी कंपनीतील प्रवर्तकांचा हिस्सा ९३.१० टक्के होता, तो आता ६९.७० टक्के झाला आहे.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner