Viral Video: दीड लाखांचा आयफोन हातात ठेवून भीक मागणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Viral Video: दीड लाखांचा आयफोन हातात ठेवून भीक मागणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल!

Viral Video: दीड लाखांचा आयफोन हातात ठेवून भीक मागणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल!

Jan 21, 2025 02:26 PM IST

Rajasthan Beggar Viral Video: दीड लाखांचा आयफोन हातात ठेवून भीक मागणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

दीड लाखांचा आयफोन हातात ठेवून भीक मागणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल!
दीड लाखांचा आयफोन हातात ठेवून भीक मागणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल!

Viral News: आयफोन खरेदी करणे हे अनेकांचे स्वप्न असते. मात्र, या फोनची किंमत लाखोंमध्ये आहे. त्यामुळे इच्छा असतानाही अनेकजण आयफोन खरेदी करणे टाळतात. परंतु, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले, ज्यात एक भिकारी हातात दीड लाखांडा आयफोन १६ प्रो मॅक्स घेऊन भीक मागताना दिसत आहे. यानंतर भिकाऱ्याने जे काही सांगितले, ते ऐकल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ राजस्थानमधील असल्याचे सांगितले जात आहे. व्हिडिओमध्ये, एका भिकारीने १.४४ लाख रुपयांचा आयफोन १६ प्रो मॅक्स हातात पकडलेला दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे या व्यक्तीने हा फोन ईएमआय किंवा क्रेडिटवर खरेदी केला नाही तर रोख देऊन घेतला. भिकाऱ्याचे बोलणे ऐकून तिथे उपस्थित असलेले लोक आश्चर्यचकित झाले.

संबंधित व्यक्ती राजस्थानमधील अजमेर येथील असल्याचे सांगण्यात आले. तो माणूस अपंग आणि बेघर आहे. जेव्हा लोकांनी त्याच्या हातात आयफोन १६ प्रो मॅक्स पाहिला, तेव्हा त्यांनी उत्सुकतेपोटी त्याला विचारायला सुरुवात केली. मग त्या व्यक्तीने सांगितले की, त्याच्या हातात नुकताच लॉन्च झालेला आयफोन १६ प्रो मॅक्स आहे. अ‍ॅपलच्या अधिकृत वेबसाइटनुसार, अ‍ॅपल इंटेलिजेंससाठी बनवलेल्या आयफोन १६ प्रो मॅक्सची किंमत जवळपास दीड लाख रुपये आहे.

एका सोशल मीडिया वापरकर्त्याने लिहिले की, ‘हा सर्वोत्तम व्यवसाय आहे, त्यात कोणतीही गुंतवणूक नाही आणि नोकरीला कोणताही धोका नाही. जास्त कष्ट आणि ताणही नाही. जर तुम्हाला तुमचा छंद पूर्ण करायचा असेल तर हा सर्वोत्तम व्यवसाय आहे.’ दुसऱ्या युजरने लिहिले आहे की, ‘हा व्हिडिओ बनावट वाटतो. व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी कोणीतरी त्याला त्याचा फोन दिला आहे, असे दिसते.’ तिसऱ्या युजरने लिहिले आहे की, ‘मी भिकाऱ्यांना भीक देणे बंद केले आहे. कारण, ते माझ्यापेक्षा जास्त कमवतात.’ आणखी एका युजरने म्हटले आहे की, ‘मी गेल्या अनेक वर्षांपासून आयफोन खरेदी करण्याचा विचार करत आहे. पण पैसे नसल्यामुळे मी ते टाळले. पण आता मला त्यासाठी सर्वोत्तम उपाय सापडला आहे.’

आयफोन १६ सीरीज: किंमत

अ‍ॅपलच्या ग्लोटाइम कार्यक्रमात कंपनीने आयफोन १६ सीरिज लॉन्च केली. भारतात आयफोन १६ ची किंमत ७९ हजार ९०० रुपये आहे. तर, आयफोन १६ प्लस ८९ हजार ९०० रुपयांना उपलब्ध आहे. आयफोन १६ प्रो आणि आयफोन १६ प्रो मॅक्सची किंमत अनुक्रमे १ लाख १९ हजार ९०० रुपये आणि १ लाख ४४ हजार ९०० रुपये आहे.

Whats_app_banner