मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Mukesh Ambani's children : अशी आहे ईशा, आकाश, अनंत अंबानीची जीवनशैली, त्यांच्याबद्दल सर्वकाही !

Mukesh Ambani's children : अशी आहे ईशा, आकाश, अनंत अंबानीची जीवनशैली, त्यांच्याबद्दल सर्वकाही !

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Jan 03, 2023 04:09 PM IST

Mukesh Ambani's children : नुकतेच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा साखरपुडा झाला. त्यानिमित्ताने अंबानी कुटूंब पुन्हा एकदा चर्चेत आले. मुकेश अंबानी नुकतेच आशियातील पहिल्या क्रमांकाच्या श्रीमंतांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आले आहेत. वडिलांच्या व्यवसायात हातभार लावणाऱ्या ईशा, आकाश आणि अनंत यांची जीवनशैली कशी आहे, ते जाणून घेऊया -

 Akash, Anant, Isha and Nita Ambani, Mukesh Ambani_HT
Akash, Anant, Isha and Nita Ambani, Mukesh Ambani_HT

Mukesh Ambani's children : नुकतेच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा साखरपुडा झाला. त्यानिमित्ताने अंबानी कुटूंब पुन्हा एकदा चर्चेत आले. मुकेश अंबानी नुकतेच आशियातील पहिल्या क्रमांकाच्या श्रीमंतांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आले आहेत. वडिलांच्या व्यवसायात हातभार लावणाऱ्या ईशा, आकाश आणि अनंत यांची जीवनशैली कशी आहे, ते जाणून घेऊया -

ईशा अंबानी

मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी हिने धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेतले आहे. त्यानंतर तिने अमेरिकेच्या येल विद्यापीठातून मानसशास्त्र आणि दक्षिण आशियाई अभ्यासात बॅचलर डिग्री मिळवली. ईशा अंबानीची एकूण संपत्ती सुमारे ६६८ कोटी रुपये आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या अनेक कंपन्यांमध्ये ती महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहेत. याशिवाय ईशा रिलायन्स इंडस्ट्रीजच्या अजियो फॅशन ऑनलाइन ब्रँडचीही सीईओ आहे.

अंबानी कुटुंबाने तिच्या लग्नात सुमारे (१०० दशलक्ष डॉलर) म्हणजेच ७२० कोटी रुपये खर्च केले होते. लग्नानंतर ईशा पती पीरामलसोबत वरळी येथील गुलिटा नावाच्या बंगल्यात राहते. या बंगल्याची किंमत २०१२ मध्ये सुमारे ४५० कोटी रुपये होती, जो ईशा अंबानीचे सासरे अजय पीरामल यांनी त्यांच्या मुलगा-सुनेला लग्नात भेट म्हणून दिला होता.

आकाश अंबानी

आकाश हा ईशाचा जुळा भाऊ आहे. आकाशनेही धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आहे. अर्थशास्त्र विषयात पदवी घेतल्यानंतर तो पुढील शिक्षणासाठी अमेरिकेतील ब्राऊन विद्यापीठात गेला. आकाशला खेळ, गाड्या यांची खूप आवड आहे. आकाशने जगभरातील प्रसिद्ध खेळाडूंच्या जर्सी आणि बॅट्सचा संग्रह केला आहे. २०१९ मध्ये श्लोकासोबत विवाहबद्ध झाल्यावर तो सहकूटूंब अॅटिलियामध्ये राहतो. आकाशकडे जगातील सर्वात महाग गाडी बेंटले बेंटेगा, रेंज रोव्हर वोग, रोल्स राँईस फँन्टम ड्राॅपहेड कूप, बीएमडब्ल्यू आणि मर्सिडिजच्या अनेक सिरिजमधील गाड्या आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीच्या उच्च पदावर असलेल्या आकाशने आतापर्यंत अनेक मोठे प्रकल्प लिलया हाताळले आहेत.

अनंत अंबानी

मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका नुकतेच वचनबद्ध झाले. या दोघांच्या नात्यासंदर्भात गेले कित्येक वर्षे चर्चा रंगत होती. नृत्यांगना असलेल्या राधिका मर्चंटने रिलायन्स जिओच्या कार्यक्रमात केलेले अरंगेत्रम नृत्य विशेष गाजले होते. हे दोघेही अमेरिकेत शिक्षण घेत होते. अनंत अंबानी यानेही आपल्या भावंडांप्रमाणेच धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून शिक्षण पूर्ण केले आहे. आइसलँडमधील ब्राऊन विद्यापीठातून पदवी प्राप्त केली. आई नीता अंबानी सोबत तो मुंबई इंडियन्सचा सहमालक आहे. अनंत अंबानीची संपत्ती अंदाजे ७३.८ अब्ज डाॅलर्स आहे.

लहानपणापासूनच अनंत अंबानीला दम्याचा त्रास आहे. औषधांमुळे त्याचे वजन १०८ किलोंच्या घरात गेले होते. डायटिशन ऋजुता दिवेकरच्या सल्ल्याने त्याने १८ महिन्यात आपले वजन कमी करुन सर्वांनाच आश्चर्यचकित केले होते.

WhatsApp channel

संबंधित बातम्या