DHFL Scam : ३४ हजार कोटींचा बँक घोटाळा; CBI कडून DHFL चे माजी संचालक धीरज वाधवानला अटक
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  DHFL Scam : ३४ हजार कोटींचा बँक घोटाळा; CBI कडून DHFL चे माजी संचालक धीरज वाधवानला अटक

DHFL Scam : ३४ हजार कोटींचा बँक घोटाळा; CBI कडून DHFL चे माजी संचालक धीरज वाधवानला अटक

May 14, 2024 08:43 PM IST

DHFL Scam : DHFL चे माजी संचालक धीरज वाधवान (Dheeraj Wadhawan) यांना सीबीआने अटक केली आहे. ३४,००० कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

DHFL चे माजी संचालक धीरज वाधवान यांना अटक
DHFL चे माजी संचालक धीरज वाधवान यांना अटक

Dhfl scam : ३४ हजार कोटींच्या बँक घोटाळा प्रकरणी सीबीआयने मोठी कारवाई करत दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडचे ( डीएचएफएल) माजी संचालक धीरज वाधवान (Dheeraj wadwan) यांना ताब्यात घेतलं आहे. धीरज वाधवानला अटक करत दिल्लीतील विशेष न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

सीबीआयने डीएचएफएलचे माजी संचालक धीरज वाधवान यांना सोमवारी रात्री ताब्यात घेण्यात आले. ३४,००० कोटी रुपयांच्या बँक घोटाळा प्रकरणात सीबीआयने मोठी कारवाई करत त्यांना अटक केली आहे. याप्रकरणी सीबीआयने आरोपपत्र दाखल केले असून त्यांना दिल्लीतील विशेष कोर्टात हजर करण्यात आले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (१३ मे) रात्री धीरज वाधवानला मुंबईतून अटक करण्यात आली. यानंतर आज (मंगळवार) दिल्लीतील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. सीबीआयने २०२२ मध्येच या खटल्याच्या संदर्भात त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केले होते. त्यांना यापूर्वीही अटक करण्यात आली होती, मात्र वाधवान सध्या जामीनावर बाहेर होते.

३४ हजार ६१५ कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप -

१७ बँकांच्या समुहाला तब्बल ३४ हजार कोटीहून अधिक रक्कमेला गंडा घातल्याप्रकरणी तपास यंत्रणेने जून २०२२ मध्ये गुन्हा दाखल केला होता. या १७ बँकांच्या समुहाचे नेतृत्व युनियन बँक ऑफ इंडियाकडे होते. बँकांच्या तक्रारीवरून वाधवान व इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या आरोपींनी २०१० ते २०१८ या ८ वर्षात डीएचएफएलला ४२,७८१ कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. आरोपपत्रात म्हटले होते की, कपिल आणि धीरज वाधवान आणि इतरांनी मिळून हेराफेरी केली. त्यांनी मे २०१९ पासून कर्जाचं पेमेंट डिफॉल्ट करून ३४,६१५ कोटींची फसवणूक केली.

सीबीआय अधिकाऱ्यांनी सांगितले की, येस बँक घोटाळा प्रकरणी वाधवानला याआधी अटक केली होती मात्र सध्या ते जामिनावर बाहेर होते. सीबीआयने याप्रकरणी २०२२ मध्ये त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते.

 

Whats_app_banner