IPO Listing : धन धना धन! धनलक्ष्मी क्रॉप सायन्सच्या आयपीओनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  IPO Listing : धन धना धन! धनलक्ष्मी क्रॉप सायन्सच्या आयपीओनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल

IPO Listing : धन धना धन! धनलक्ष्मी क्रॉप सायन्सच्या आयपीओनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल

Dec 16, 2024 04:21 PM IST

Dhanlaxmi Crop Science IPO Listing : कृषी क्षेत्रासाठी विविध प्रकारची बियाणी विकसित करणाऱ्या धनलक्ष्मी क्रॉप सायन्सच्या आयपीओनं गुंतवणूकदारांना नफ्याचं भरघोस पीक दिलं आहे.

IPO Listing : धन धना धन! धनलक्ष्मी क्रॉप सायन्सच्या आयपीओनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल
IPO Listing : धन धना धन! धनलक्ष्मी क्रॉप सायन्सच्या आयपीओनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल

IPO Listing Today : धनलक्ष्मी क्रॉप सायन्सच्या शेअरनं मार्केटमध्ये दणक्यात एन्ट्री करत गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे. धनलक्ष्मी क्रॉप सायन्सचा शेअर ९० टक्क्यांच्या वाढीसह १०४.५० रुपयांवर बाजारात लिस्ट झाला आहे. 

आयपीओमध्ये कंपनीच्या शेअरची किंमत ५५ रुपये होती. धनलक्ष्मी क्रॉप सायन्सचा आयपीओ ९ डिसेंबर २०२४ रोजी सट्टेबाजीसाठी खुला झाला आणि ११ डिसेंबरपर्यंत खुला होता. हा आयपीओ २३.८० कोटी रुपयांचा होता. ही कंपनी शेतातील पिके व भाजीपाल्यासाठी विविध प्रकारची बियाणे विकसित, प्रक्रिया व विक्री करते.

लिस्टिंगनंतरही शेअरमध्ये तेजी
धनलक्ष्मी क्रॉप सायन्सच्या शेअर्समध्ये ९० टक्के प्रीमियमवर जबरदस्त लिस्टिंगनंतर तेजी आली आहे. लिस्टिंगनंतर यात जोरदार तेजी आली. त्यानंतर शेअरला ५ टक्क्यांचं अप्पर सर्किट लागलं. हा शेअर १०९.७० रुपयांवर पोहोचला. ५५ रुपयांच्या इश्यू प्राइसच्या तुलनेत कंपनीच्या शेअरनं पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. धनलक्ष्मी क्रॉप सायन्सच्या समभागांनी इश्यू प्राइसच्या तुलनेत जवळपास १०० टक्के उसळी घेतली आहे. आयपीओपूर्वी कंपनीतील प्रवर्तकांचा हिस्सा ७६.७० टक्के होता, तो आता ५६.३७ टक्क्यांवर आला आहे.

कसा होता आयपीओला प्रतिसाद?

धनलक्ष्मी क्रॉप सायन्सचा आयपीओ एकूण ५५५.८३ पट सबस्क्राइब झाला होता. कंपनीच्या आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा कोटा ४४१.१८ पट सब्सक्राइब झाला होता. तर नॉन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स (NII) श्रेणीत तो १२४१.२७ पट सब्सक्राइब झाला. तर क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल बायर्स (QIB) श्रेणीत या आयपीओला १९७.६५ पट सब्सक्रिप्शन मिळालं होतं. कंपनीच्या आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांना केवळ एका लॉटसाठी अर्ज करता आला. आयपीओच्या एका लॉटमध्ये २००० शेअर्स होते. म्हणजेच रिटेल गुंतवणूकदारांना १ लॉटसाठी १.१० लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागली.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner