Share Market News Marathi : धनलक्ष्मी क्रॉप सायन्सचा आयपीओ आज गुंतवणुकीसाठी खुला झाला. हा आयपीओ बुधवार, ११ डिसेंबरपर्यंत खुला राहणार आहे. कंपनीच्या आयपीओचा आकार ४३.२८ कोटी रुपये आहे. आयपीओच्या माध्यमातून कंपनी ४३.२८ लाख नवे शेअर्स जारी करणार आहे. १२ डिसेंबरला गुंतवणूकदारांना शेअर्सचं वाटप होणार असून १६ डिसेंबरला लिस्टिंग होणार आहे.
धनलक्ष्मी क्रॉप सायन्स आयपीओची किंमत ५२ ते ५५ रुपये प्रति शेअर अशी आहे. आयपीओसाठी कंपनीनं २००० शेअर्सचा लॉट बनवला आहे. त्यामुळं गुंतवणूकदारांना किमान १,१०,००० रुपयांचा सट्टा लावावा लागणार आहे. ही कंपनी एनएसई एसएमईवर लिस्टेड होती.
कंपनीचा आयपीओ आज ग्रे मार्केटमध्ये २८ रुपयांच्या प्रीमियमवर व्यवहार करत आहे. गेल्या काही दिवसांपासून जीएमपी जैसे थे आहे. इन्व्हेस्टर्स गेनच्या अहवालानुसार, आयपीओची प्रस्तावित लिस्टिंग ८३ रुपये आहे. सध्या कंपनीचा आयपीओ आतापर्यंतच्या सर्वोच्च जीएमपीवर ट्रेड करत आहे.
कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी जास्तीत जास्त ५० टक्के हिस्सा राखीव ठेवला जाऊ शकतो. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी किमान ३५ टक्के हिस्सा राखीव ठेवण्यात येणार आहे. किमान १५ टक्के हिस्सा बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. या आयपीओने अँकर गुंतवणूकदारांच्या माध्यमातून ६.३७ कोटी रुपये उभे करण्यात यश मिळवलं आहे. कंपनीचा आयपीओ ६ डिसेंबर रोजी अँकर गुंतवणूकदारांसाठी खुला झाला आहे.
धनलक्ष्मी क्रॉप सायन्स लिमिटेडची स्थापना २००५ मध्ये झाली. ही कंपनी विविध पिके आणि भाजीपाल्यासाठी बियाणे तयार करते, त्यावर प्रक्रिया करते आणि विकते.
संबंधित बातम्या