IPO Listing : डेंटा वॉटर अँड इन्फ्रा सोल्युशन्सचा शेअर लिस्ट झाला! गुंतवणूकदारांचा फायदा झाला की तोटा? पाहा!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  IPO Listing : डेंटा वॉटर अँड इन्फ्रा सोल्युशन्सचा शेअर लिस्ट झाला! गुंतवणूकदारांचा फायदा झाला की तोटा? पाहा!

IPO Listing : डेंटा वॉटर अँड इन्फ्रा सोल्युशन्सचा शेअर लिस्ट झाला! गुंतवणूकदारांचा फायदा झाला की तोटा? पाहा!

Jan 29, 2025 10:29 AM IST

Denta Water IPO Listing : डेंटा वॉटर अँड इन्फ्रा सोल्युशन्सचा आयपीओ आज बीएसई आणि एनएसईवर लिस्ट झाला. पहिल्या दिवशी या शेअरनं गुंतवणूकदारांना सकारात्मक परतावा दिला.

IPO Listing : डेंटा वॉटर अँड इन्फ्रा सोल्युशन्सचा शेअर लिस्ट झाला! गुंतवणूकदारांचा फायदा झाला की तोटा? पाहा!
IPO Listing : डेंटा वॉटर अँड इन्फ्रा सोल्युशन्सचा शेअर लिस्ट झाला! गुंतवणूकदारांचा फायदा झाला की तोटा? पाहा!

Share Market News : वॉटर अँड इन्फ्रा सोल्युशन्स पुरवठादार कंपनी डेंटा वॉटर अँड इन्फ्रा सोल्युशन्सचा आयपीओ आज, बुधवारी बीएसई आणि एनएसईवर लिस्ट झाला. कंपनीच्या शेअर्सची लिस्टिंग चांगली झाली. पहिल्या दिवशी गुंतवणूकदारांना ११ ते १३ टक्के नफा झाला. 

बीएसईवर हा शेअर ३३० रुपयांवर सूचीबद्ध झाला. आयपीओमध्ये शेअरची किंमत २९४ रुपये होती. त्यामुळं गुंतवणूकदारांना १३ टक्के नफा झाला. तर, एनएसईवर हा शेअर ११ टक्के प्रीमियमसह ३२५ रुपयांवर सूचीबद्ध झाला.

डेंटा वॉटरचा आयपीओ २२ जानेवारीला खुला झाला होता आणि २४ जानेवारीला बंद झाला. या आयपीओला गुंतवणूकदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. २२ जानेवारी रोजी निविदा उघडल्यानंतर काही मिनिटांतच हा आयपीओ पूर्ण क्षमतेनं सबस्क्राइब झाला. तीन दिवसांत हा आयपीओ २२१ हून अधिक वेळा सबस्क्राइब करण्यात आला. डेंटा वॉटर अँड इन्फ्रा सोल्युशन्सनं अँकर गुंतवणूकदारांकडून ६६ कोटी रुपयांहून अधिक रक्कम गोळा केली होती.

कंपनीनं २२०.५ कोटी रुपयांच्या आयपीओसाठी प्रति शेअर २७९ ते २९४ रुपये प्राइस बँड निश्चित केला होता. हा आयपीओ पूर्णपणे ७५ लाख नवीन शेअर्सवर आधारित आहे. यात विक्रीची कोणतीही ऑफर (OFS) नव्हती. 

काय करते ही कंपनी?

२०१६ मध्ये स्थापन झालेली डेंटा वॉटर अँड इन्फ्रा सोल्युशन्स ही एक वेगानं वाढणारी वॉटर अँड इन्फ्रा सोल्यूशन्स कंपनी आहे. ही कंपनी भूजल पुनर्भरण प्रकल्पांसह पाणी व्यवस्थापन, इन्फ्रा प्रकल्पांचं डिझाइन, उभारणी आणि प्रकल्प कार्यान्वित करण्यात गुंतलेली आहे.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. तज्ज्ञांची मतं, सूचना व शिफारशी त्यांच्या वैयक्तिक आहेत. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner