Denta Water IPO GMP : अवघ्या काही तासांत १० पट सबस्क्राइब झाला आयपीओ; अर्ज करावा की नको? वाचा सविस्तर
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Denta Water IPO GMP : अवघ्या काही तासांत १० पट सबस्क्राइब झाला आयपीओ; अर्ज करावा की नको? वाचा सविस्तर

Denta Water IPO GMP : अवघ्या काही तासांत १० पट सबस्क्राइब झाला आयपीओ; अर्ज करावा की नको? वाचा सविस्तर

Jan 22, 2025 02:39 PM IST

Denta Water and Infra IPO : जल व्यवस्थापनासह इतरही क्षेत्रात कार्यरत असलेल्या डेंटा वॉटर अँड इन्फ्रा लिमिटेड कंपनीचा आयपीओ आज गुंतवणुकीसाठी खुला झाला आणि अवघ्या काही तासांत तो १० पटीहून अधिक सबस्क्राइब झाला.

Denta Water IPO GMP : अवघ्या काही तासांत १० पट सबस्क्राइब झाला आयपीओ; अर्ज करावा की नको? वाचा सविस्तर
Denta Water IPO GMP : अवघ्या काही तासांत १० पट सबस्क्राइब झाला आयपीओ; अर्ज करावा की नको? वाचा सविस्तर

IPO News in Marathi : जलव्यवस्थापन व पायाभूत सुविधा क्षेत्रातील डेंटा वॉटर अँड इन्फ्रा सोल्युशन्स लिमिटेडचा आयपीओ आज गुंतवणुकीसाठी खुला झाला. खुला झाल्यानंतर पहिल्या काही तासांतच हा आयपीओ १० पटीहून अधिक सबस्क्राइब झाला आहे. येत्या २४ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत यात गुंतवणूक करता येणार आहे. 

डेंटाच्या आयपीओ दरपट्टा २७९ ते २९४ रुपये प्रति इक्विटी शेअर असा आहे. कंपनीनं आयपीओमधून २२०.५० कोटी रुपये उभे करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. आयपीओ सब्सक्रिप्शन सुरू होण्यापूर्वी कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये बऱ्यापैकी प्रीमियमवर ट्रेड करत आहेत. शेअर बाजारातील जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, आज ग्रे मार्केटमध्ये कंपनीचे शेअर्स १६६ रुपयांच्या प्रीमियमवर उपलब्ध आहेत.

काय आहे सब्सक्रिप्शन स्टेटस?

निविदेच्या पहिल्या दिवशी दुपारी १.४५ वाजेपर्यंत हा आयपीओ ९.७९ पट सबस्क्राइब झाला आहे. रिटेल श्रेणीत ११.२१ पट, एनआयआय श्रेणीत १७.४४ पट तर, क्यूआयबी श्रेणीत १.५६ पट सबस्क्रिप्शन मिळालं आहे.

जीएमपी: शेअर बाजार निरीक्षकांच्या मते, आज ग्रे मार्केटमध्ये डेंटा वॉटर अँड इन्फ्रा लिमिटेडचे शेअर्स १६६ रुपयांच्या प्रीमियमवर उपलब्ध आहेत.

प्राइस बँड : कंपनीनं पब्लिक इश्यूसाठी प्रति इक्विटी शेअर २७९ ते २९४ रुपये प्राइस बँड जाहीर केला आहे.

आयपीओ सबस्क्रिप्शन मुदत : येत्या २४ जानेवारीपर्यंत सबस्क्रिप्शनसाठी खुला राहील.

आयपीओ आकार: कंपनीनं आपल्या पूर्णपणे नवीन बुक बिल्ड इश्यूमधून २२०.५० कोटी रुपये उभे करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे.

आयपीओ लॉट आकार: एका लॉटमध्ये एकूण ५० शेअर्स आहेत.

अलॉटमेंट डेट : शेअर अलॉटमेंटची सर्वात संभाव्य तारीख २५ जानेवारी २०२५ आहे. मात्र, विलंब झाल्यास २७ जानेवारी २०२५ रोजी शेअरवाटप अपेक्षित आहे.

आयपीओ रजिस्ट्रार : इंटिग्रेटेड रजिस्ट्री मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडला बुक बिल्ड इश्यूचे अधिकृत रजिस्ट्रार म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे.

आयपीओ लीड मॅनेजर: एसएमसी कॅपिटल लिमिटेडला बुक बिल्ड इश्यूचे लीड मॅनेजर म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे.

लिस्टिंग कधी? : हा शेअर बीएसई आणि एनएसईवर लिस्ट होणार आहे. लिस्टिंगची सर्वात संभाव्य तारीख २९ जानेवारी २०२५ म्हणजेच पुढील आठवड्यात बुधवार आहे.

अर्ज करावा की नाही?

स्टोक्सबॉक्सनं या आयपीओला 'सबस्क्राइब' टॅग दिला आहे. ‘एकूण वॉटर मॅनेजमेंट प्रोजेक्ट्स, वाढत्या बाजारपेठेच्या संधी आणि मजबूत ऑर्डर बुक हे यामागचं एक कारण आहे. मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी गुंतवणूक करावी, असं स्टोक्सबॉक्सनं म्हटलं आहे. अ‍ॅड्रोइट फायनान्शिअल सर्व्हिसेसनंही आयपीओला 'बाय' टॅग दिला आहे.

कंपनीच्या व्यवसायाबद्दल

कर्नाटकमधील मडिकेरी इथं कंपनीची ९८ एकर जमीन आहे. या ठिकाणी कंपनी कॉफी, मिरपूड आणि वेलची पिकवते. ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंत कंपनीनं ३२ पाणी व्यवस्थापन प्रकल्प राबविले आहेत. यापैकी ११ मुख्य कंत्राटदार म्हणून, तर २० उप-कंत्राटदार म्हणून राबवले आहेत. तर, एक संयुक्त उपक्रम आहे. त्याशिवाय ही कंपनी रेल्वे आणि महामार्ग बांधणीचे प्रकल्प हाती घेते. २०२३ मध्ये १७५.७५ कोटी रुपयांच्या तुलनेत २०२४ मध्ये कंपनीला २४१.८४ कोटी रुपयांचा महसूल मिळाला. २०२३ मधील ५०.११ कोटी रुपयांच्या नफ्याच्या तुलनेत २०२४ मध्ये ५९.७३ कोटी रुपयांचा नफा झाला.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. तज्ज्ञांची मतं, सूचना व शिफारशी त्यांच्या वैयक्तिक आहेत. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner