Metro Card Recharge on WhatsApp: दिल्ली मेट्रोने दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. प्रवासी व्हॉट्सअॅपवरूनच आपले मेट्रो कार्ड रिचार्ज करू शकणार आहेत. सध्याच्या तिकीट चॅटबॉटला आता नवी सुविधा देण्यात आल्याने मेट्रो कार्ड सहजरित्या रिचार्ज करता येणार आहे. याआधी प्रवाशांना मेट्रो कार्ड रिचार्ज करण्यासाठी काउंटरवर जावा लागायचे किंवा थर्ड पार्टी अॅप्सची मदत घ्यावा लागायची.
ही नवी सेवा हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून तुमचे मेट्रो कार्ड रिचार्ज करायचे असेल तर ९६५०८५५८०० क्रमांकावर HI असा मेसेज करावा लागेल किंवा दिल्ली मेट्रोचा क्यूआर कोड स्कॅन करूनही हा पर्याय उपलब्ध होईल. या चॅटबॉटसह चॅट विंडोतील सूचनांचे पालन करून तुम्ही यूपीआय, डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करून कार्ड रिचार्ज करू शकाल.
व्हॉट्सअॅपच्या मदतीने मेट्रो पास रिचार्ज करण्याचा पर्याय दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या प्रवाशांना चांगला अनुभव देईल, असे मेटा इन इंडियाचे बिझनेस मेसेजिंगचे संचालक रवी गर्ग यांनी सांगितले. सध्याच्या क्यूआर तिकीट प्रणालीचे यश पाहता लाखो लोकांचा प्रवास आनंददायी करण्यासाठी नवीन प्रणाली आमलात आणली जात आहे.
अँड्रॉइड आणि आयओएस मोबाइल अॅप्समधील व्हॉट्सअॅप पेमेंट ऑप्शनवर टॅप केल्यानंतरही युजर्सला चॅटबॉट सहज अॅक्सेस करण्याचा पर्याय मिळेल. व्हॉट्सअॅपवरील डीएमआरसीची रिचार्ज सेवा, तिकीट सेवा पेलोकल संचालित आहे. गुरुग्राम रॅपिड मेट्रो आणि दिल्ली एनसीआरमधील सर्व मार्गांवर याचा लाभ घेता येईल.
मेटा ओन्ड मेसेजिंग प्लॅटफॉर्मच्या मदतीने गेल्या वर्षी गुरुग्राम रॅपिड मेट्रो आणि डीएमआरसीच्या सर्व मार्गांवर क्यूआर तिकीट प्रणालीचा लाभ दिला जात होता. युजर्स व्हॉट्सअॅपवर मेट्रोचे तिकीट सहज बुक करू शकतात. इतकेच नव्हे तर सध्याच्या चॅटबॉटवरून गाड्यांचे वेळापत्रक, भाडे आणि स्थानकांची माहितीही मिळवता येईल.
व्हॉट्सअॅप एका नवीन फीचरवर काम करत आहे, ज्यामुळे युजर्स विशिष्ट मजकुरावर डबल टॅप करून प्रतिक्रिया देऊ शकतील. यामुळे युजर्सना मेसेजवर रिअॅक्ट करण्याचा जलद आणि त्रासमुक्त मार्ग होणार आहे.इन्स्टंट मेसेजिंग अॅप विशिष्ट संदेश, फोटो, व्हिडिओ आणि जीआयएफवर प्रतिक्रिया देण्यासाठी डबल टॅप फीचर आणत आहे. मेटाने मेटा एआयसाठी लामा ३.१.४०५ बी रोलआउट ची घोषणा केली आहे, जी लवकरच अधिकृत रिलीजनंतर देशात उपलब्ध होऊ शकते.
संबंधित बातम्या