इस्रायलकडून १५४ कोटींची निर्यातीची ऑर्डर, ‘या’ कंपनीच्या शेअरनं पकडला रॉकेटचा वेग-dcx systems share rallied 5 percent on receiving export order of 154 crore from israel ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  इस्रायलकडून १५४ कोटींची निर्यातीची ऑर्डर, ‘या’ कंपनीच्या शेअरनं पकडला रॉकेटचा वेग

इस्रायलकडून १५४ कोटींची निर्यातीची ऑर्डर, ‘या’ कंपनीच्या शेअरनं पकडला रॉकेटचा वेग

HT Marathi Desk HT Marathi
Sep 19, 2024 01:55 PM IST

डीसीएक्स सिस्टीम्सला इस्रायलच्या एल्टा सिस्टिम्सकडून १५४.८० कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. गुरुवारी कंपनीचा शेअर ५ टक्क्यांनी वधारून ३५५.०५ रुपयांवर पोहोचला.

डीसीएक्स सिस्टीम्सचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर ४५१.९० रुपये आहे.
डीसीएक्स सिस्टीम्सचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर ४५१.९० रुपये आहे.

एअरोस्पेस आणि डिफेन्स इंडस्ट्रीशी संबंधित डीसीएक्स सिस्टीम्स या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. मुंबई शेअर बाजारात गुरुवारी डीसीएक्स सिस्टीम्सचा शेअर ५ टक्क्यांनी वधारून ३५५.०५ रुपयांवर पोहोचला. मोठी ऑर्डर मिळाल्याने कंपनीच्या शेअर्समध्ये ही जोरदार वाढ झाली आहे. इस्रायलच्या एल्टा सिस्टीमकडून १५४.८० कोटी रुपयांची निर्यात ऑर्डर मिळाल्याचे कंपनीने जाहीर केले आहे.

डीसीएक्स सिस्टीम्सने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, हा आदेश आरएफ इलेक्ट्रॉनिक मॉड्यूलच्या पुरवठ्याशी संबंधित आहे आणि तो 12 महिन्यांच्या आत पूर्ण केला जाणार
आहे. कंपनीच्या उपकंपनीला नुकताच कोचीन स्पेशल इकॉनॉमिक झोनकडून (सीएसईझेड) औद्योगिक परवाना मिळाला आहे. मायक्रोवेब सबमॉड्यूलच्या निर्मिती आणि चाचणीसाठी हा परवाना देण्यात आला आहे. तसेच कंपनी एव्हिओनिक्स आणि डिफेन्स इलेक्ट्रॉनिक उपकरणे तयार करू शकणार आहे. हा परवाना १५ वर्षांसाठी वैध आहे.

डीसीएक्स सिस्टीम्सच्या आयपीओमध्ये
कंपनीच्या शेअरची किंमत २०७ रुपये होती. कंपनीचा आयपीओ ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी सब्सक्रिप्शनसाठी खुला झाला आणि २ नोव्हेंबरपर्यंत खुला राहिला. ११ नोव्हेंबर २०२२ रोजी कंपनीचा शेअर २८६.२५ रुपयांवर लिस्ट झाला होता. कंपनीचा शेअर १९ सप्टेंबर २०२४ रोजी ३५५.०५ रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीचा 52 आठवड्यांतील उच्चांकी स्तर 451.90 रुपये आहे. तर कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 235 रुपये आहे. स्मॉलकॅप कंपनीचे मार्केट कॅप ३८४५ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. कंपनीचा आयपीओ एकूण ६९.७९ पट सब्सक्राइब झाला. आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा कोटा ६१.७७ पट सब्सक्राइब झाला होता. कंपनीच्या आयपीओमध्ये नॉन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सचा (एनआयआय) कोटा ४३.९७ पट सब्सक्राइब झाला होता. तर क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल बायर्स (क्यूआयबी) श्रेणीत ८४.३२ पट बाजी लावण्यात आली.

Whats_app_banner