मराठी बातम्या  /  बिझनेस  /  DCX Systems IPO : आयपीओ असावा तर असा, पहिल्याच दिवशी ४५ टक्के वाढ

DCX Systems IPO : आयपीओ असावा तर असा, पहिल्याच दिवशी ४५ टक्के वाढ

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Nov 11, 2022 01:20 PM IST

DCX Systems IPO : शेअर बाजारात डीसीएक्स सिस्टिमचे ((DCX Systems IPO) शेअर्स आज बीएसई आणि एनएसईवर लिस्टिंग झाले पहिल्याच दिवशी कंपनी शेअर्सच्या लिस्टिंगमध्ये जबरदस्त वाढ झाली आहे.

IPO HT
IPO HT

DCX Systems IPO :  DCX Systems IPO च्या शेअर्सनी पहिल्याच दिवशी शेअर बाजारात धुंवाधार बॅटिंग करत लिस्टिंग झाले आहे. पहिल्याच दिवशी वायर क्षेत्रातील या कंपनीचे शेअर्स बीएसईवर २८९.१० रुपये आपल्या ईश्यू प्राईजच्या ३९.६६ टक्के वाढीसह सूचीबद्ध झाले आहेत तर एनएसईवर २८७ रुपये ईश्यू किंमतींपेक्षा ते ८० रुपये अधिक वाढले आहे. डीसीएक्सचा प्राइस बँड १९७-२०७ रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला होता. लिस्टिंग झाल्यानंतर काही वेळातच १०.४० वाजता कंपनीचे शेअर्स जवळपास ४५% वाढून ३०५ रुपये झाले. हा इश्यू ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत गुंतवणुकीसाठी खुला होता.

आयपीओला मिळाला जबरदस्त रिस्पाॅन्स

डीसीएक्स सिस्टम्सच्या आयपीओला जबरदस्त रिस्पाॅन्स मिळाला आहे. एनएसईकडून मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीचा आयपीओ सबस्क्रिप्शनच्या शेवटच्या दिवशी बुधवारी ६९.७९ टक्के सबस्क्राईब्ड झाला होता। आयपीओमध्ये १.४५ कोटी समभागांच्या तुलनेत १०१.२७ कोटी समभागांसाठी बोली प्राप्त झाली. मात्र क्वालिफाईड संस्थात्मक खरेदीदारांचा कोटा ८४.३२ पट सबस्क्राईब्ड झाला तर गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांचा कोटा ४३.९७ पट सबस्क्राईब्ड झाला. 

गुंतवणूकदारांना सल्ला 

डीसीएक्स शेअरमध्ये दीर्घकालीन गुंतवणूकीचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. शेअर इंडियाचे उपाध्यक्ष आणि संशोधन प्रमुख रवी सिंग म्हणाले की, भारतात संरक्षण आणि एरोस्पेसच्या संधी वाढत आहेत. अशा परिस्थितीत डीसीएक्स कंपनीला काम करण्याची विशेष संधी मिळणार आहे. गुंतवणूकदार दीर्घकालीन दृष्टीकोनातून डीसीएक्स सिस्टम्सच्या शेअर्सचा विचार करू शकतात, असेही त्यांनी सांगितले. 

(डिस्‍क्‍लेमर: ही माहिती केवळ कंपन्यांच्या शेअर मार्केटमधील कामगिरीवर आधारीत आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. त्यामुळं वाचकांनी आपल्या वित्तीय सल्लागाराच्या सुचनेनुसारच गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा.)

 

 

WhatsApp channel

विभाग