मराठी बातम्या  /  Business  /  Dcb Bank Increases Interest Rate On Fixed Deposits For Senior Citizens

Fixed deposit : ज्येष्ठ नागरिकांसाठी या बॅकेने दिले ७.६ टक्के व्याजदर, डिटेल्स पहा

Fixed deposit HT
Fixed deposit HT
Kulkarni Rutuja Sudeep • HT Marathi
Dec 02, 2022 04:36 PM IST

Fixed deposit : डीसीबी बँकेने ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या मुदत ठेवीवरील व्याजदरात वाढ केली आहे. ही मुदतवाढ वयवर्ष ६० वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना लागू करण्यात येणार आहेत.

Fixed deposit : डीसीबी बँकेने ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या मुदत ठेवीवरील व्याजदरात वाढ केली आहे. ही मुदतवाढ वयवर्ष ६० वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना लागू करण्यात येणार आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

डीसीबी बॅकेने दिलेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ नागरिक निश्चित ठेवीची रक्कम दोन कोटी रुपयांपेक्षा कमी असल्यास ७०० दिवसांच्या निश्चित ठेवीवर ७.६० टक्के प्रती वर्ष याप्रमाणे व्याजदर लागू होईल. ७०० दिवसांपेक्षा जास्त आणि ३६ महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी डीसीबी ज्येष्ठ नागरिक निश्चित ठेवींवर ८.२५ टक्के प्रती वर्ष व्याज दर दिला जाणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना जास्त कालावधीसाठी ठेव ठेवता येणार आहे. उदा. ३६ महिने ते ६० महिने कालावधीसाठी ७.७५ टक्के प्रती वर्ष दर मिळेल. निश्चित ठेवींवरील हे आकर्षक व्याजदर वाढीव आहेत, म्हणजेच डीसीबी निश्चित ठेवीच्या रकमेनुसार व्याजदरही वाढेल.

यावर्षीच्या मे महिन्यापासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने चार वेळा रेपो रेट वाढवल्यामुळे बँकेच्या निश्चित ठेवी कमी जोखीम क्षमता असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आकर्षक पर्याय ठरल्या आहेत.

या एफडीचे लाभ पुढीलप्रमाणे -

- ठेवीच्या कालावधीदरम्यान मूळ रक्कम आणि व्याज दर सुरक्षित राहातील.

- उच्च परतावे म्हणजे खात्रीशीर परतावे आणि जास्त मिळकत.

- निश्चित ठेवींवरील व्याज दर निवृत्त व्यक्तींसाठी उत्पन्नाचा नियमित किंवा पूरक मार्ग ठरू शकतो.

- व्याज दर मासिक, तिमाही, सहामाही किंवा वार्षिक पातळीवर मिळवण्याचा पर्याय.

- व्याज दर थेट बचत खात्यात हस्तांतरित करण्याचा पर्याय.

- प्राप्ती कर कायद्याच्या सेक्शन ८० सी अंतर्गत पाच वर्षांच्या निश्चित ठेवीवर कर सवलत, एफडी खातेधारकांनी सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक.

-सुलभ लिक्विडीटीमुळे ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक गरजेच्या वेळेस निश्चित ठेव बंद करणे सहज शक्य.

संबंधित बातम्या

विभाग