DAM Capital News : वर्षाचा शेवट गोड झाला! आयपीओमध्ये २८३ रुपये किंमत असलेला शेअर लिस्ट होताच ४५० पार गेला!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  DAM Capital News : वर्षाचा शेवट गोड झाला! आयपीओमध्ये २८३ रुपये किंमत असलेला शेअर लिस्ट होताच ४५० पार गेला!

DAM Capital News : वर्षाचा शेवट गोड झाला! आयपीओमध्ये २८३ रुपये किंमत असलेला शेअर लिस्ट होताच ४५० पार गेला!

Dec 29, 2024 09:40 AM IST

DAM Capital Advisors IPO Listing News : डीएएम कॅपिटल अ‍ॅडव्हायझर्सच्या आयपीओनं गुंतवणूकदारांचा वर्षाचा शेवट गोड केला आहे. कंपनीचा शेअर आज जोरदार वाढीसह लिस्ट झाला आहे.

dam capital News : आयपीओमध्ये २८३ रुपये किंमत असलेला शेअर लिस्ट होताच ४५० पार गेला!
dam capital News : आयपीओमध्ये २८३ रुपये किंमत असलेला शेअर लिस्ट होताच ४५० पार गेला!

IPO Listing News In Marathi : डीएएम कॅपिटल अ‍ॅडव्हायझर्सनं शेअर बाजारात जबरदस्त सुरुवात केली आहे. कंपनीचे शेअर्स नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर (NSE) ३८.८७ टक्क्यांच्या प्रीमियमसह ३९३ रुपयांवर लिस्ट झाले आहेत. तर मुंबई शेअर बाजारात (BSE) कंपनीचे समभाग ३८.८३ टक्क्यांच्या प्रीमियमसह ३९२.९० रुपयांवर सूचीबद्ध आहेत. सूचीबद्ध झाल्यानंतर काही वेळातच शेअरचा भाव ४५० पार गेला आहे.

आयपीओमध्ये डीएएम कॅपिटल अ‍ॅडव्हायझर्सच्या शेअरची किंमत २८३ रुपये होती. कंपनीचा एकूण इश्यू साइज ८४०.२५ कोटी रुपयांपर्यंत होता. हा आयपीओ १९ डिसेंबररोजी सब्सक्रिप्शनसाठी खुला झाला आणि २३ डिसेंबरपर्यंत खुला राहिला.
लिस्टिंगनंतर डीएएम कॅपिटल अ‍ॅडव्हायझर्सच्या शेअर्समध्ये तेजी आली आहे. बीएसईवर कंपनीचा शेअर १५ टक्क्यांहून अधिक वाढून ४५६.९० रुपयांवर पोहोचला आहे. एनएसईवर कंपनीचा शेअर १५ टक्क्यांहून अधिक वधारून ४५६.९० रुपयांवर पोहोचला आहे.

प्रवर्तकांचा हिस्सा किती घटला?

आयपीओ येण्याआधी कंपनीतील प्रवर्तकांचा हिस्सा ४५.८८ टक्के होता, तो आता ४१.५ टक्क्यांवर आला आहे. धर्मेश अनिल मेहता, सोनाली धर्मेश मेहता आणि बूमबकेट अ‍ॅडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेड हे कंपनीचे प्रवर्तक आहेत.

आयपीओ झाला होता ८१ पट सबस्क्राइब

डीएएम कॅपिटल अ‍ॅडव्हायझर्सचा आयपीओ एकूण ८१.८८ पट सबस्क्राइब झाला होता. आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा कोटा २६.८ पट, तर कर्मचाऱ्यांचा कोटा ४०.०९ पट सबस्क्राइब झाला होता. आयपीओमध्ये नॉन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स (NII) श्रेणीत ९८.४७ पट, तर पात्र संस्थात्मक खरेदीदारांचा कोटा १६६.३३ पट सब्सक्राइब झाला होता. कंपनीच्या आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदार कमीत कमी एका आणि जास्तीत जास्त १३ लॉटसाठी अर्ज करू शकत होते. आयपीओमध्ये एका लॉटमध्ये ५३ शेअर्स होते. म्हणजेच किरकोळ गुंतवणूकदारांना किमान १४,९९९ रुपयांची गुंतवणूक करावी लागली होती.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner