Jio Recharge: जिओ आपल्या युजर्सना प्रत्येक कॅटेगरीतील बेस्ट प्लान ऑफर करत आहे. जर तुम्ही असे युजर असाल ज्यांना डेटापेक्षा जास्त कॉलिंगची गरज असेल तर जिओ फोन प्लान तुमच्यासाठी बेस्ट आहेत. जिओ फोनच्या या प्लानमध्ये तुम्हाला दररोज ३ जीबीपर्यंत डेटा मिळेल. या प्लानमध्ये कंपनी फ्री एसएमएस देखील देत आहे. विशेष म्हणजे या प्लानमध्ये युजर्संना जिओ सिनेमा आणि जिओ टीव्हीचा फ्री अॅक्सेस देखील मिळणार आहे. विशेष म्हणजे एक प्लान देखील आहे जो नेटफ्लिक्स सब्सक्रिप्शनसोबत येतो.
जिओचा हा प्लान २८ दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लानमध्ये इंटरनेट वापरण्यासाठी दररोज ३ जीबी डेटा मिळणार आहे. या प्लानमध्ये युजर्संना अनलिमिटेड 5G डेटा देखील मिळणार आहे. जिओच्या या प्लानमध्ये देशभरातील सर्व नेटवर्कवर दररोज १०० फ्री एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळते. प्लानमध्ये तुम्हाला जिओ टीव्ही आणि जिओ सिनेमाचा फ्री अॅक्सेस मिळेल.
८४ दिवसांची वैधता असलेल्या या प्लानमध्ये इंटरनेट वापरण्यासाठी दररोज ३जीबी डेटा मिळेल. या प्लानमध्ये युजर्संना अनलिमिटेड 5जी डेटा देखील दिला जातो. या प्लानमध्ये तुम्हाला १०० फ्री एसएमएसही मिळतील. या प्लानमध्ये कंपनी अनलिमिटेड कॉलिंगबेनिफिट्सही देत आहे. प्लानमध्ये देण्यात येणाऱ्या अतिरिक्त बेनिफिट्समध्ये जिओ टीव्ही आणि जिओ सिनेमाचे फ्री सब्सक्रिप्शन चा समावेश आहे.
जिओच्या या प्लान मध्ये तुम्हाला ८४ दिवसांची वैधता मिळणार आहे. या प्लानमध्ये इंटरनेट वापरण्यासाठी दररोज ३ जीबी डेटा मिळणार आहे. इतर प्लान प्रमाणेच कंपनी पात्र युजर्सना अनलिमिटेड 5जी डेटा देत आहे. या प्लानमध्ये तुम्हाला डेली १०० फ्री एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळेल. प्लानमध्ये नेटफ्लिक्सचे (बेसिक) फ्री सब्सक्रिप्शन दिले जात आहे. याशिवाय जिओ टीव्ही आणि जिओ सिनेमाचा फ्री अॅक्सेसही मिळणार आहे. लक्षात ठेवा यापैकी कोणत्याही प्लानमध्ये तुम्हाला जिओ सिनेमा प्रीमियमचे सब्सक्रिप्शन मिळणार नाही.
संबंधित बातम्या