DA Arear Proposal: देशातील १ कोटी केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना आनंदाची बातमी आहे. कर्मचाऱ्यांना मागील १८ महिन्यांचा डीए थकबाकीसह (arears) मिळणार आहे. केंद्र सरकारकडे सरकारी कर्मचाऱ्यांना १८ महिन्यांचा डीए देण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात एरियर देण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी संयुक्त सल्लागार मशीनरी, राष्ट्रीय परिषद (कर्मचारी पक्ष) चे सचिव शिव गोपाल मिश्रा यांनी केंद्र सरकारकडे पेंडिंग असलेली १८ महिन्यांचा डीए थकबाकी देण्याचा आग्रह केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे याबाबतचा प्रस्ताव पाठवला आहे. COVID-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने जानेवारी २०२० पासून जून २०२१ पर्यंत १८ महिन्यांचा DA आणि DR पेमेंट थांबवले होते. त्यापूर्वी भारतीय कामगार संरक्षण संघाचे महासचिव मुकेश सिंह यांनी केंद्र सरकारने पेमेंट वितरीत करण्याची मागणी केली होती.
गेल्या १८ महिन्यांपासूनचा डीए थकबाकीसह थकीत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, कोविड १९ महामारीमुळे आर्थिक समस्या निर्माण झाल्या असून याची आम्हाला कल्पना आहे. या कारणामुळे २०२०-२१ मध्ये महागाई भत्ता देण्यात आलेला नाही. मात्र आता कोरोना स्थितीतून देश उभारी घेत आहे.
पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात मिश्रा यांनी म्हटले आहे की, जर सरकार १८ महिन्यांचा डीए एरियरचा प्रस्ताव सरकारने स्वीकार केला तर, कर्मचाऱ्यांना वेतनाच्या रुपात मोठी रक्कम मिळू शकते. महागाईच्या काळात हे त्यांना मदत करू शकते.
दरम्यान महाराष्ट्र सरकारकडूनही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी देण्यात आली आहे. सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात भरघोस वाढ केली आहे. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४६ टक्क्यांवरून ५० टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. आता राज्य सरकारीकर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात थेट ४ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे राज्य सरकारमधील शासकीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
संबंधित बातम्या