मराठी बातम्या  /  बिझनेस  /  UPI fraud : यूपीआयद्वारे मुंबईत तब्बल ८१ जणांना कोट्यवधींचा गंडा; ‘या’ चुका टाळा!

UPI fraud : यूपीआयद्वारे मुंबईत तब्बल ८१ जणांना कोट्यवधींचा गंडा; ‘या’ चुका टाळा!

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Mar 29, 2023 05:50 PM IST

UPI fraud : यूपीआय़द्वारे पेमेंट करण्यामुळे व्यवहार पटापट होतात. पण त्याचबरोबर त्याच्या सुरक्षेचा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे. कारण लोकांना आँनलाईन फसवणूक करण्याचे प्रकार आता वाढले आहेत.

UPI fraud HT
UPI fraud HT

UPI fraud : देशात युपीआयच्या माध्यमातून व्यवहार होण्याचे प्रमाण वेगाने वाढले आहे. यूपीआयमुळे बील भरणं असो वा तिकीट बुकिंग करणे अत्यंत सोप्पे झाले आहे. लहान मोठ्या कामांसाठी आपण सर्रास यूपीआयचा वापर करुन पैसे ट्रान्सफर करतो, ही त्याची जमेची बाजू.

पण आता याच युपीआयच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. लोकांची फसवणूक होण्याचे प्रमाण वाढले आहे. सायबर गुन्ह्याचे प्रमाणही लक्षणीयरित्या वाढले आहे. ह्रॅकर्स वेगवेगळी शक्कल लढवून जनतेला लुटत आहेत. मुंबईतून असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

यूपीआयच्या माध्यमातून मुंबईत ८१ जणांची १ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. यूपीआय पेमेंट करताना ग्राहकांची झालेली शुल्लक चूक या लोकांना महागात पडली आहे. प्रथम दर्शनी हॅकर्स पेमेंटमध्ये चूक झाल्याचे दाखवतात. त्यानंतर पैसे खात्यातून काढून घेतात. मुंबईतील ८१ जणांसोबत असा प्रकार घडला असून त्यातून १ कोटींची फसवणूक केली आहे.

कशी होते फसवणूक

सायबर ठग सुरुवातील UPI द्वारे लोकांच्या खात्यात काही पैसे पाठवतात. यानंतर ते लोकांना फोन करून पैसे चुकून पाठवल्याचे सांगतात आणि त्यांना ते परत करण्याची विनंती करतात. जर तुम्ही त्यांच्या खात्यावर पैसे पाठवले तर तुमच्या बँकेचे सर्व तपशील जसे की KYC संबंधित माहितीसह तुमचा पॅन आणि आधार तपशील देखील त्यांच्यापर्यंत पोहोचतात. यासाठी सायबर ठग एक प्रकारचे मालवेअर वापरतात. त्यानंतर ते तुमचे बँक खाते पूर्णपणे हॅक करून ते त्यांच्या ताब्यात घेऊ शकतात.

अशी टाळा फसवणूक

ही फसवणूक टाळण्याचा सर्वात सोप्पा मार्ग म्हणजे कोणत्याही अनोळखी नंबरवरून आलेल्या काॅलला आपण बँकेची माहिती देऊ नये. किंवा यूपीआयद्वारे पैसे ट्रान्सफर केल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत तुम्ही कोणत्याही अनोळखी व्यक्तीला स्क्रीनशॉट पाठवू नये. शंका आल्यास जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार करावी.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग