Rupay, Debit or Credit cards : आगामी काळात ग्राहक आपल्या आवडत्या कार्डाची निवड करु शकतात. याचाच अर्थ ग्राहकच आता रुपे कार्ड घ्यायचं की व्हिसा की मास्टरकार्ड याची निवड करता येईल. भारतीय रिझर्व्ह बँकेने हा प्रस्ताव सादर केला आहे. त्यामध्ये कार्ड नेटवर्क जारी करणाऱ्या बँका आणि नाॅन बँकांनाच ग्राहकांना कार्ड निवडीचे स्वातंत्र्य देण्याचा उल्लेख यात केला आहे. अधिकृत कार्ड नेटवर्कद्वारे डेबिट, क्रेडिट अथवा प्रीपेड कार्ड जारी करण्यासाठी बँका तसेच बिगर वित्तीय संस्थांशी करार केला जातो.
प्रस्तावानुसार, कार्ड जारी करणाऱ्या अधिकृत संस्था आपल्या पात्र ग्राहकांना विविध कार्ड नेटवर्कमधून कोणत्याही एका कार्डाला निवडण्याचं स्वातंत्र्य देतील. या पर्यायाचा वापर ग्राहक कार्ड जारी करण्याआधी अथवा ते जारी झाल्यानंतरही करु शकतात.कार्ड नेटवर्क जारी करणाऱ्यांनी केवळ एकाच कार्ड नेटवर्कवर अवलंबून राहू नये. त्यांनी एकापेक्षा अधिक कार्ड नेटवर्कचा वापर केला पाहिजे. आरबीआयने चार आॅगस्टपर्यंत यासंदर्भात बँकांकडून मते मागितली आहेत.
भारतात अधिकृत कार्ड नेटवर्कमध्ये अमेरिकन एक्सप्रेस बँकिंग काॅर्प, डायनर्स क्लब इंटरनॅशनल, मास्टरकार्ड एशिया / पॅसिफिक पीटीई लिमिटेड, नॅशनल पेमेंट काॅर्पोरेशन आँफ इंडिया, रुपये आणि व्हिसा वर्ल्डवाईड लिमिटेड यांचा समावेश आहे.
संबंधित बातम्या