मराठी बातम्या  /  business  /  Credit Suisse : डबघाईला आलेल्या क्रेडिट सुईसला UBS कडून मिळाली संजीवनी, शेअर्समध्ये रिकव्हरी
Credit Suisse HT
Credit Suisse HT

Credit Suisse : डबघाईला आलेल्या क्रेडिट सुईसला UBS कडून मिळाली संजीवनी, शेअर्समध्ये रिकव्हरी

19 March 2023, 8:41 ISTKulkarni Rutuja Sudeep

credit Suisse : डबघाईला आलेल्या क्रेडिट सुईस बँकेला मदतीचा हात देण्यासाठी युबीएस ग्रुप एजी पुढे सरसावले आहे. क्रेडिट सुईस आणि यूबीएसने करारासंदर्भात अधिक माहिती देण्यास इन्कार केला आहे.

credit Suisse : स्वित्झर्लँडच्या क्रेडिट सुईस बँकेतील काही हिस्सा खरेदीसाठी युबीएस ग्रुप एजी (UBS group AG) पुढे सरसावली आहे. या प्रकरणाशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्विस नियामक यूबीएस आणि क्रेडिट सुईस यांच्यात करार पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित करेल. या करारात कोणत्याही प्रकारे अडसर घालण्याचा अधिकार नियामकांना नाहीत.

ट्रेंडिंग न्यूज

फायनान्शिअल टाईम्सच्या वृत्तानुसार, करारासंदर्भात क्रेडिट सुईस आणि .यूबीएसने माहिती देण्यास नकार दिला आहे. ट्रेडिंगदरम्यान क्रेडिट सुईसच्या शेअर्समध्ये ९ टक्क्यांची उसळी पहायला मिळाली. १६७ वर्षे पूर्वीच्या क्रेडिट सुईस बँकेतही सध्या आर्थिक टंचाई भासत आहे. त्यामुळे या बँकेच्या शेअर्समध्ये गेल्या काही दिवसांपासून जबरदस्त घट झाली. गेल्या एका आठवड्यात अमेरिकन सिलिकाॅन व्हॅली बँक आणि सिग्नेचर बँकेमुळेही शेअर बाजारात अस्थिरतेचे वातावरण आहे.

क्रेडिट सुईसवर कारवाई करतानाच सोसायटी जनरल एसए आणि ड्यूश बँक एजी सहित कमीत कमी चार प्रमुख बँकांनी या बँकेशी निगडित व्यवहारांवर बंदी घातली आहे. स्विस केंद्रीय बँकेने क्रेडिट सुईसला ४४.५ अब्ज पाऊंड्सची आर्थिक मदत देण्याची तयारी दाखवली आहे. क्रेडिट सुईसच्या स्विस बँकिंग डिव्हिजनचे प्रमुख आंद्रे हेलफिस्टन यांच्या म्हणण्यानुसार, आर्थिक मदतीमुळे बँकेला फायदा होईल पण ग्राहकांचा विश्वास पुन्हा संपादन करण्यास अजून थोडासा वेळ लागेल.

विभाग