cred and phonepe news : फिनटेक अॅप्सच्या माध्यमातून क्रेडिट कार्डचे बिल भरणाऱ्या ग्राहकांना ३० जूननंतर अडचणी येऊ शकतात. अनेक बँका आणि क्रेडिट कार्ड जारी करणाऱ्या कंपन्यांनी आरबीआयच्या भारत बिल पेमेंट सिस्टिम म्हणजेच बीबीपीएसवर नोंदणी केलेली नाही, अशा ग्राहकांना अॅप्सच्या माध्यमातून बिल भरता येणार नाही.
रिझर्व्ह बँकेने नोंदणीची शेवटची तारीख ३० जून निश्चित केली आहे. एचडीएफसी, आयसीआयसीआय आणि अॅक्सिस बँकेने अद्याप बीबीपीएस नोंदणी केलेली नाही. या तिन्ही बँकांमध्ये पाच कोटींहून अधिक क्रेडिट कार्डधारक आहेत. तर, फिनटेक अॅप्स फोनपे आणि क्रेड आधीच नोंदणीकृत आहेत. नोंदणी न केलेल्या बँकांच्या ग्राहकांनाही १ जुलैपासून फिनटेक कंपन्यांच्या अॅपद्वारे बिल भरता येणार नाही.
भारत बिल पेमेंट सिस्टम ही बिल भरण्याची एक एकीकृत प्रणाली आहे, जी ग्राहकांना ऑनलाइन बिल भरण्याची सेवा प्रदान करते. ही प्रणाली नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एनपीसीआय अंतर्गत काम करते. यूपीआय आणि रूपेप्रमाणे बीबीपीएस देखील नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने तयार केले. याद्वारे एकाच प्लॅटफॉर्मवर सर्व बिले भरता येतात.
ही मुदत ९० दिवसांनी वाढवण्याची मागणी कंपन्या आणि बँकांनी केल्याचे सांगण्यात येत आहे. आतापर्यंत केवळ आठ बँकांनी बीबीपीएसवर बिल पेमेंट अॅक्टिव्हेट केले. सार्वजनिक क्षेत्रातील कॅनरा बँकेचे 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील अधिकृत खाते हॅक झाले आहे. बँकेने रविवारी आपल्या ग्राहकांना सोशल मीडिया हँडल पूर्ववत होईपर्यंत वापरू नये, असे आवाहन केले आहे.
कॅनरा बँकेचे अधिकृत 'एक्स' खाते हॅक झाल्याची माहिती कॅनरा बँक सर्व संबंधितांना देऊ इच्छिते. कॅनरा बँकेचे एक्स हँडल लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. "आम्ही वापरकर्त्यांना आमच्या 'एक्स' पेजवर काहीही पोस्ट न करण्याचे आवाहन करतो. ती पूर्ववत होईल आणि कॅनरा बँक नियंत्रणाखाली काम करण्यास सुरवात होईल, तेव्हा आम्ही त्वरित माहिती देऊ. अधिक माहिती आणि सेवांसाठी जवळच्या बँक शाखांना भेट द्यावी किंवा अधिकृत वेबसाइट/ ऑनलाइन माध्यमांना भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.