मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Sukanya samruddhi yojana : मुलींचं भविष्य घडवणारी योजना; ५०० रुपयांचे होतील अडीच लाख

Sukanya samruddhi yojana : मुलींचं भविष्य घडवणारी योजना; ५०० रुपयांचे होतील अडीच लाख

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Nov 10, 2022 05:42 PM IST

Sukanya samruddhi yojana :या योजनेत तुम्ही तुमच्या १० वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीच्या नावावर खाते उघडू शकता. त्यामुळे करमुक्तीचा लाभ मिळेल

sukanya samruddhi yoajna  HT
sukanya samruddhi yoajna HT

Sukanya samruddhi yojana : केंद्र सरकारतर्फे अनेक लघु बचत योजना राबवल्या जातात. या योजनांमध्ये छोट्या रकमेची गुंतवणूक करुन भविष्यात चांगली बचत करता येऊ शकते. जर तुम्ही तुमच्या लाडक्या लेकीच्या भविष्यातील शिक्षण आणि लग्नकार्यासाठी गुंतवणूक आताच करण्याचे योजित असाल तर सुकन्या समृद्धी योजना हा उत्तम पर्याय ठरु शकतो. या योजनेत ७.८ टक्के व्याज मिळत आहे. योजनेत एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त १.५ लाख रुपये गुंतवणूक जमा केले जाऊ शकतात.

तर एकाच आर्थिक वर्षात कमीत कमी २५० रुपये जमा करणे अत्यावश्यक आहे. या योजनेत २५० रुपये जमा न केल्यास ५० रुपये भूर्दंड बसू शकतो. तुमच्या मुलीच्या वयाच्या २१ वर्षी सुकन्या समृद्धी योजनेचे खाते मॅच्युअर्ड होते.

बॅक अथवा पोस्टात पैसे जमा करण्याची सोय

योजनेत केवळ १५ वर्षे पैसे जमा करावे लागतात. मात्र व्याजाचा फायदा मुलीच्या २१ वर्ष पूर्ण झाल्यानंतरच मिळतो. देशातील कोणत्याही पोस्ट आँफिस अथवा बॅकेत सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडता येते. जर तुमच्या मुलीचे वय १० वर्षांच्या आत असेल तर सुकन्या समृद्धी योजनेेचे खाते उघडता येते. यात एकावेळी एकाच मुलीचे खाते उघडण्याची सोय असून पालकांनाही या खात्यातील करसवलतीचा लाभ घेता येतो.

किती टक्के मिळणार परतावा

तुमच्या मुलीचे वय १ वर्ष आहे, आणि प्रति महिना तुम्ही ५०० रुपये जमा करत असल्यास वर्षभरात ही रक्कम अंदाजे ६००० रुपये होईल. या प्रमाणे जेंव्हा ही योजना मच्योअर होईल तेंव्हा ही रक्कम अंदाजे ९० हजार रुपये जमा होतील. यावर अंदाजे ७१६ टक्के व्याजाअंतर्गत अंदाजे १,६४,६०६ रुपये व्याज मिळेल. एकूणच मुलीच्या वयाच्या २१ वर्षी अंदाजे २,५४,६०६ रुपये मिळतील.

पैसे कधी काढता येतील

तुमच्या मुलीच्या वयाच्या २१ वर्षी ही योजना मच्योअर्ड होते.यात जमा केलेले पैसे तिच्या वयाच्या १८ वर्षीही काढता येतात. अर्थात त्यावेळी फक्त ५० टक्के हिस्सा काढता येतो. यात सलग १५ वर्षे पैसे जमा करावे लागतात.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग