stocks in focus : कंडोम बनविणाऱ्या कंपनीचे शेअर खरेदी करण्यासाठी झुंबड, कारण काय?-condom company cupid limited share hits skyrocketing upper circuit 95 rupees price after 282 percent profit ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  stocks in focus : कंडोम बनविणाऱ्या कंपनीचे शेअर खरेदी करण्यासाठी झुंबड, कारण काय?

stocks in focus : कंडोम बनविणाऱ्या कंपनीचे शेअर खरेदी करण्यासाठी झुंबड, कारण काय?

Aug 07, 2024 11:40 AM IST

cupid limited Q1 results : कंडोम उत्पादक क्यूपिड लिमिटेडच्या तिमाही निकालानंतर शेअर्सवर गुंतवणूकदारांच्या उड्या पडत आहेत.

stocks in focus : कंडोम बनविणाऱ्या कंपनीचे शेअर खरेदी करण्यासाठी झुंबड, कारण काय?
stocks in focus : कंडोम बनविणाऱ्या कंपनीचे शेअर खरेदी करण्यासाठी झुंबड, कारण काय?

cupid limited Q1 results : कंडोम उत्पादक क्यूपिड लिमिटेडच्या शेअर्सवर आज गुंतवणूकदारांच्या रडारवर आहेत. जून तिमाहीच्या उत्कृष्ट निकालांमुळं कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी आली आहे. आज या शेअरला ५ टक्क्यांचं अपर सर्किट लागलं आहे. क्यूपिड लिमिटेडचा शेअर बीएसईवर ९५.९९ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. 

पुरुष-महिलांसाठी कंडोम बनवणाऱ्या या कंपनीनं मंगळवारी संध्याकाळी उशिरा जून तिमाहीचे निकाल जाहीर केले. जून तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा २८२.६ टक्क्यांनी वाढून ८२५.५१ लाख रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत हा नफा २१५.७९ रुपये होता. याशिवाय क्यूपिड लिमिटेडचं उत्पन्न जून तिमाहीत २५.१ टक्क्यांनी वाढून ४४०२.६० लाख रुपये झाले आहे. मागील वर्षी याच तिमाहीत एकूण उत्पन्न ३५१९.७७ लाख रुपये होते.

कंपनी काय म्हणते…

कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, संचालक मंडळानं ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर (जीसीसी) क्षेत्रात बाजारपेठेतील हिस्सा मिळविण्यासाठी यूएईमधील उपकंपनीचा समावेश करण्यास मान्यता दिली आहे. पालवा येथील ग्रीन फिल्ड प्लांटचा आराखडा तयार असून, कॅलेंडर वर्ष २०२५ च्या अखेरीस हा प्रकल्प कार्यान्वित होणं अपेक्षित आहे. परफ्यूम उत्पादनं, हेअर ऑईल, मसाज ऑईल आणि क्रीमच्या विकासासह पॉकेट परफ्यूम आणि डिओडरंट लाँच करण्यात आले आहेत. क्यूपिड व्हर्जन ३ महिला कंडोमसाठी यूएस एफडीएची मंजुरी प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

हा शेअर वर्षभरापासून देतोय परतावा 

यंदाच्या कॅलेंडर वर्षात आतापर्यंत कंपनीचे समभाग ६५ टक्क्यांनी वधारले आहेत. वर्षभरात या शेअरनं जवळपास ६०० टक्के इतका मजबूत परतावा दिला आहे. वर्षभरापूर्वी या शेअरचा भाव फक्त १४ रुपये होता. या शेअरनं पाच वर्षांत १,३९० टक्के परतावा दिला आहे. या शेअरची ५२ आठवड्यांतील उच्चांकी किंमत १४१.६५ रुपये आणि ५२ आठवड्यांची नीचांकी किंमत १३.९९ रुपये आहे. कंपनीचं मार्केट कॅप २५७५.९४ कोटी रुपये आहे.

काय करते ही कंपनी?

या कंपनीची स्थापना १९९३ मध्ये झाली. क्युपिड लिमिटेड ही भारतातील पुरुष आणि महिला कंडोम, पाण्यावर आधारित लुब्रिकेंट जेली, आयव्हीडी किट आणि डिओडरंटची आघाडीची उत्पादक कंपनी आहे. दरवर्षी ४८० दशलक्ष पुरुष कंडोम, ५२ दशलक्ष महिला कंडोम, २१० दशलक्ष सॅशे ल्युब्रिकेंट जेली आणि ३० दशलक्ष आयव्हीडी चाचणी किटची या कंपनीची उत्पादन क्षमता आहे. कंपनीनं नुकतीच क्यूपिड डिओडरंट आणि पॉकेट परफ्यूम्सची सीरिज लाँच केली आहे.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. त्यामुळं गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्याआधी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करावी.)