मराठी बातम्या  /  बिझनेस  /  LPG Price news : गॅस सिलिंडरच्या दरात मोठी घट! तब्बल ३० रुपयांनी स्वस्त; देशात कुठे, किती दर? वाचा

LPG Price news : गॅस सिलिंडरच्या दरात मोठी घट! तब्बल ३० रुपयांनी स्वस्त; देशात कुठे, किती दर? वाचा

Jul 01, 2024 09:29 AM IST

LPG Price 1 July : देशभरात सिलिंडरच्या किमतीत मोठी घट झाली आहे. दिल्लीत सिलिंडर ३० रुपयांनी स्वस्त झाला आहे. तर कोलकात्यात ३१ रुपयांनी स्वस्त झाला आहे. मुंबई-चेन्नईमध्ये जवळपास ३० रुपयांनी सिलेंडर स्वस्त झाला आहे.

LPG सिलेंडरच्या दरात मोठी घट! तब्बल ३० रुपयांनी गॅस झाला स्वस्त; देशात कुठे किती दर, वाचा
LPG सिलेंडरच्या दरात मोठी घट! तब्बल ३० रुपयांनी गॅस झाला स्वस्त; देशात कुठे किती दर, वाचा (PTI)

LPG Price 1 July : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत आज १ जुलैपासून मोठा बदल झाला आहे. मोदी सरकारच्या ३.० च्या कार्यकाळाच्या सुरुवातीनंतर एलपीजीच्या दरात झालेला हा पहिला मोठा बदल आहे. आजपासून सिलिंडरच्या किमती या तब्बल ३० रुपयांनी स्वस्त झाल्या आहेत. 

मुंबई-चेन्नईमध्ये देखील सिलिंडरच्या किमती या ३१ रुपयांची कमी झाल्या आहेत. राजधानी दिल्लीत सिलेंडर ३० रुपयांनी स्वस्त झाला आहे. तर कोलकात्यात ३१ रुपयांनी स्वस्त झाला आहे. एलपीजी गॅसच्या किमतीत हा बदल केवळ व्यावसायिक सिलिंडरमध्ये झाला आहे. घरगुती सिलिंडरचे दर बदललेले नाहीत. एलपीजी सिलिंडरचे हे दर इंडियन ऑईलकडून लागू करण्यात आले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

एलपीजी सिलिंडर कुठे कोणत्या किमतीत मिळणार ?

दिल्लीत आज घरगुती सिलेंडरची किंमत ८०३ रुपयांवरून आणि व्यावसायिक सिलेंडरची किंमत १६७६ रुपयांवरून १६४६ रुपयांवर आला आहे. कोलकातामध्ये १४.२ किलोचा घरघुती एलपीजी सिलिंडर ८२९ रुपयांना किमतीत कोणताही बदल न करता मिळणार आहे. तर १९ किलोचा व्यावसायिक सिलिंडर आजपासून ३१ रुपयांनी स्वस्त झाला असून हा सिलेंडर १२५६ रुपयांना मिळणार आहे.

मुंबईत ३१ रुपयनांनी व्यावसायिक गॅस झाला स्वस्त

चेन्नईमध्ये आजपासून व्यावसायिक सिलिंडर १८४०.५० रुपयांऐवजी १८०९.५० रुपयांना मिळणार आहे. येथे घरगुती सिलिंडर ८१८.५० रुपयांना मिळतो. मुंबईबद्दल बोलायचे झाले तर, येथेही घरगुती सिलिंडरची किंमत केवळ ८०२.५० रुपये आहे, परंतु व्यावसायिक सिलिंडरच्या किमती ३१ रुपयांनी कमी झाल्या आहेत.

बिहारची राजधानी पाटणा येथे आज १४.२ किलोचा इंडेन एलपीजी घरघुती वापराचा गॅस सिलिंडर ९०१ रुपयांना उपलब्ध आहे. तर, १९ किलोचा व्यावसायिक सिलिंडर १९१५.५ रुपयांवर आला आहे. गुजरातमधील अहमदाबादमध्ये १९ किलोचा व्यावसायीक सिलिंडर आता फक्त १६६५ रुपयांना मिळणार आहे. तर, १४ किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत ८१० रुपये आहे.

ऑगस्ट २०२३ पासून घरगुती सिलिंडरच्या किमती जैसे थे

१ जून २०२३ रोजी दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत ११०३ रुपये होते. तर ३० ऑगस्ट २०२३ रोजी या किमती २०० रुपयांनी कमी करण्यात अळ्या होत्या. घरगुती सिलिंडरची किंमत ९०३ रुपये झाली. तर ९ मार्च २०२४ रोजी पुन्हा एकदा घरगुती सिलिंडर १०० रुपयांनी स्वस्त झाला. आजपासून मुंबईत व्यावसायिक सिलिंडरची किंमत १५९८ रुपये झाली आहे. यापूर्वी व्यावसायीक सिलिंडर हा १६२९ रुपयांना मिळत होता.

WhatsApp channel
विभाग