Cochin Shipyard Share Price : जहाज बांधणी क्षेत्रातील एक प्रमुख कंपनी कोचीन शिपयार्ड लिमिटेडचे शेअर रॉकेटच्या वेगान धावत आहेत. आज, आठवड्याच्या पहिल्या दिवशी बीएसईवर कोचीन शिपयार्डचा शेअर ५ टक्क्यांनी वधारून १६५५.७५ रुपयांवर पोहोचला. मिनी रत्न कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ संरक्षण मंत्रालयाकडून मोठे कंत्राट मिळाल्यानंतर झाली आहे.
कोचीन शिपयार्डनं संरक्षण मंत्रालयासोबत १००० कोटी रुपयांचा करार केला आहे. हा करार भारतीय नौदलाच्या एका मोठ्या जहाजाच्या शॉर्ट रिफिट आणि ड्राय डॉकिंगसाठी आहे. या प्रकल्पाचा अंदाजित कालावधी सुमारे ५ महिन्यांचा आहे.
मिनी रत्न कंपनी कोचीन शिपयार्ड लिमिटेडने नुकताच सिट्रियम लेटरन्यू यूएसए इंक (एसएलईटी) सोबत करार केला आहे. हा सामंजस्य करार भारतीय बाजारपेठेतील जॅक-अप रिगच्या डिझाइन आणि महत्त्वपूर्ण उपकरणांसाठी आहे. गेल्या पाच दिवसांत कंपनीच्या शेअरमध्ये १५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
गेल्या वर्षभरात कोचीन शिपयार्डच्या शेअरमध्ये १७८ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. ४ डिसेंबर २०२३ रोजी जहाज कंपनीचा शेअर ५९४.४२ रुपयांवर होता. कोचीन शिपयार्डचा शेअर २ डिसेंबर २०२४ रोजी १६५५.७५ रुपयांवर पोहोचला आहे. कोचीन शिपयार्डच्या शेअरमध्ये यंदा आतापर्यंत १४३ टक्के वाढ झाली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला १ जानेवारी २०२४ रोजी कंपनीचा शेअर ६८१.५३ रुपयांवर होता. २ डिसेंबर २०२४ रोजी कंपनीचा शेअर १६५० रुपयांवर बंद झाला. कोचीन शिपयार्डच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा उच्चांक २९७७.१० रुपये आहे. तर कंपनीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी ५७७.८८ रुपये आहे.
कोचीन शिपयार्ड लिमिटेडला चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत १८९ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत कंपनीच्या नफ्यात ४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मिनी रत्न कंपनीला सप्टेंबर २०२४ तिमाहीत १८२ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीत कंपनीचा महसूल १३ टक्क्यांनी वाढून १,१४३.२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
संबंधित बातम्या