मराठी बातम्या  /  बिझनेस  /  dividend stocks : कोल इंडिया, टेक महिंद्रा यांच्यासह १० कंपन्या देतात मजबूत लाभांश! तुमच्याकडं आहेत का शेअर?

dividend stocks : कोल इंडिया, टेक महिंद्रा यांच्यासह १० कंपन्या देतात मजबूत लाभांश! तुमच्याकडं आहेत का शेअर?

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Apr 05, 2024 07:53 PM IST

Dividend stocks : सर्वाधिक लाभांश देणाऱ्या दहा कंपन्यांची यादी रेलिगेअर ब्रोकिंगनं केली आहे. त्यात कोल इंडिया, जीएसएफसी, टेक महिंद्रा या कंपन्यांचाही समावेश आहे.

कोल इंडिया, टेक महिंद्रा यांच्यासह आणखी ८ कंपन्या देतात मजबूत डिविडंड! तुमच्याकडं आहेत का शेअर?
कोल इंडिया, टेक महिंद्रा यांच्यासह आणखी ८ कंपन्या देतात मजबूत डिविडंड! तुमच्याकडं आहेत का शेअर? (dividend yield)

Share Market news : शेअर बाजारातील गुंतवणुकीतून उत्तम परतावा मिळवण्याचे जे काही मार्ग आहेत, त्यात लाभांश (Dividend) हा देखील एक मार्ग आहे. भरघोस लाभांश देणाऱ्या कंपन्यांमध्ये योग्य वेळी गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांसाठी ती कायमची फायदेशीर ठरते. त्यामुळं काही गुंतवणूकदारांचा कल अशा कंपन्यांकडं असतो.  

ट्रेंडिंग न्यूज

देशांतर्गत ब्रोकरेज फर्म रेलिगेअर ब्रोकिंगनुसार, कोल इंडिया (Coal India), गुजरात स्टेट फर्टिलायझर्स अँड केमिकल्स (GSFC) अशा काही कंपन्या सर्वाधिक लाभांश देणाऱ्यांपैकी आहेत. गुंतवणूकदारांच्या माहितीसाठी अशा १० कंपन्याची यादी रेलिगेअर ब्रोकिंगनं काढली आहे. लाभांशातून उत्पन्न मिळवण्यात रस असणारे गुंतवणूकदार या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करू शकतात, असं रेलिगेअर ब्रोकिंगनं म्हटलं आहे.

गेल्या वर्षभरात कंपनीनं दिलेल्या एकूण लाभांशाला सध्याच्या शेअरच्या किमतीनं भागून कंपनीच्या लाभांशाची टक्केवारी काढली जाते. त्या आधारे क्रम लावल्यास कोल इंडिया ही कंपनी पहिल्या क्रमांकावर आहे. या कंपनीनं ५.६ टक्के लाभांश दिला आहे. तर, जीएसएफसी ही कंपनी ५.१ टक्के लाभांशासह दुसऱ्या स्थानी आहे. ब्रोकरेजनुसार, आर्थिक वर्ष २०२२ मध्ये कोल इंडियानं प्रति शेअर १७ रुपये आणि आर्थिक वर्ष २०२३ मध्ये प्रति शेअर २४.३ रुपये लाभांश दिला आहे.

सर्वाधिक लाभांश देणाऱ्या कंपन्या

कोल इंडिया

सध्या ४४७.२५ रुपये किंमत असलेल्या कोल इंडियानं मागील आर्थिक वर्षांमध्ये ५.६ टक्के लाभांश दिला आहे. आर्थिक वर्ष २०२२ मध्ये शेअरमागे १७ रुपये आणि आर्थिक वर्ष २०२३ मध्ये शेअरमागे २४.३ रुपये दिले आहेत.

जीएसएफसी (GSFC)

जीएसएफसीच्या शेअरची किंमत सध्या २४१.७० रुपये आहे. या कंपनीनं ५.१ टक्के लाभांश दिला आहे. आर्थिक वर्ष २०२२ मध्ये एका शेअरला २.५ रुपये आणि आर्थिक वर्ष २०२३ मध्ये शेअरमागे १० रुपये दिले आहेत.

360 वन वॅम

'३६० वन वॅम' या कंपनीनं आर्थिक वर्ष २०२२ मध्ये शेअरमागे ५५ रुपये आणि २०२३ मध्ये शेअरमागे ३४.५ रुपये लाभांश दिला आहे. ही टक्केवारी ५.१ इतकी आहे. या कंपनीच्या शेअरचा भाव सध्या ७१३.८५ रुपये आहे. 

गुजरात नर्मदा व्हॅली फर्टिलायझर्स अँड केमिकल्स लिमिटेड

या कंपनीनं ४.६ टक्के दरानं लाभांश दिला आहे. यात आर्थिक वर्ष २०२२ मध्ये प्रति शेअर १० रुपये आणि २०२३ मध्ये प्रति शेअर २९.५ रुपयांचा समावेश आहे. कंपनीच्या शेअरची किंमत सध्या ७०७.३० रुपये आहे. 

व्हीएसटी इंडस्ट्रीज

सध्या शेअरचा भाव ३६८६.६० रुपये असलेल्या व्हीएसटी इंडस्ट्रीजनं ४.२ टक्के दरानं लाभांश दिला आहे. आर्थिक २०२२ मध्ये प्रति शेअर १४० रुपये आणि २०२३ मध्ये प्रति शेअर १५० रुपये दिले आहेत.

ओएनजीसी

ओएनजीसीच्या शेअरची किंमत सध्या २६७.९० रुपये आहे. या कंपनीनं आर्थिक वर्ष २०२२ मध्ये प्रति शेअर १०.५ रुपये आणि आर्थिक वर्ष २०२३ मध्ये शेअरमागे ११.३ रुपये लाभांश दिला आहे.

पीटीसी इंडिया

पीटीसी इंडियाच्या शेअरची किंमत २००.४५ रुपये आहे. या कंपनीन आर्थिक वर्ष २०२२ मध्ये एक शेअरवर ७.८ रुपये आणि २०२३ मध्ये ७.८ रुपये लाभांश दिला आहे.

Tech महिंद्रा

टेक महिंद्राच्या एका शेअरची किंमत सध्या १२६३.२५ रुपये असून या कंपनीनं आर्थिक वर्ष २०२२ मध्ये शेअरमागे ४५ रुपये आणि आर्थिक वर्ष २०२३ मध्ये एका शेअरवर ५० रुपये असा भरघोस लाभांश दिला आहे. 

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन

या शेअरची किंमत सध्या २७३.८० रुपये आहे. कंपनीनं आर्थिक वर्ष २०२२ मध्ये एका शेअरवर १४.८ रुपये आणि आर्थिक वर्ष २०२३ मध्ये एका शेअरवर १०.७० रुपये लाभांश दिला आहे.

पेट्रोनेट एलएनजी

पेट्रोनेट एलएनजी या कंपनीनं २०२२ या आर्थिक वर्षात एका शेअरवर ११.५ रुपये तर, आर्थिक वर्ष २०२३ मध्ये एका शेअरवर १० रुपये लाभांश दिला आहे.

 

(डिस्क्लेमर: वरील मते आणि शिफारशी विश्लेषक, तज्ञ आणि ब्रोकिंग कंपन्यांची  वैयक्तिक आहेत. हिंदुस्तान टाइम्स मराठीची नाहीत. हा कोणत्याही गुंतवणुकीचा सल्ला नाही. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग