Nothing CMF Phone 1 Sale : टेक कंपनी नोथिंगचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन सीएमएफ फोन १ हा आज (१२ जुलै) दुपारी १२. ०० वाजता पहिल्यांदा विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला. हा सेल लाइव्ह होताच फोनला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. सीएमएफ फोन १ हा फोन अवघ्या ३ तासांत एक लाख लोकांनी खरेदी केला आहे. खुद्द सीएमएफ बाय नथिंगने आपल्या अधिकृत एक्स हँडलवर या विक्रमी विक्रीची माहिती दिली आहे.
सीएमएफ बाय नथिंगने एक्सवर पोस्ट केले की, कंपनीने सीएमएफ फोन १ ची विक्रमी विक्री केली. अवघ्या ३ तासांत एक लाख फोनची विक्री झाली . यासोबतच कंपनीने असेही सांगितले आहे की, नथिंग फोन २ ए ची २४ तासात एक लाख फोनची विक्री झाली आहे.
सीएमएफ फोन १ हा सर्वात स्वस्त स्मार्टफोन म्हणून लॉन्च करण्यात आला. या फोनची खासियत म्हणजे त्याचे रिमूवेबल बॅक कव्हर. जे तुम्ही स्वत:ला बदलू शकता. चला तर मग जाणून घेऊया प्रत्येकाच्या बजेटमध्ये असलेल्या या फोनची किंमत आणि त्याचे उत्तम फीचर्स:
भारतीय बाजारात सीएमएफ फोन १ हा ६ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज आणि ८ जीबी रॅम + १२८ स्टोरेज व्हेरियंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. दोन्ही फोनची किंमत अनुक्रमे १५ हजार ९९९ रुपये आणि १७ हजार ९९९ रुपये आहे.
सीएमएफ फोन १ मध्ये ६.६७ इंचाची एमोलेड स्क्रीन आहे. ही स्क्रीन १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट, एचडीआर १०+ सपोर्ट आणि २,००० नाइट्सची पीक ब्राइटनेससह येते. हा स्मार्टफोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह येतो. या फोनमध्ये व्हिडिओ चॅट आणि सेल्फीसाठी कंपनीने फ्रंटमध्ये १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनच्या मागील बाजूस ड्युअल रियर कॅमेरा युनिट आहे, सोनीचा ५० एमपी मुख्य कॅमेरा एफ /१.८ लेन्ससह आहे. यात फास्ट चार्जिंगसह ५,००० एमएएच ची बॅटरी मिळते. सीएमएफ फोन १ मध्ये मीडियाटेक डायमेंसिटी ७३०० 5G चिपसेट, ८ जीबी पर्यंत रॅम आणि २५६ जीबी पर्यंत स्टोरेज आहे. हँडसेट अँड्रॉइड १४ वर आधारित ओएसवर चालतो.
संबंधित बातम्या