Grape Production: वातावरण बदलाचा द्राक्ष उत्पादनावर घातक परिणाम; बायोस्टिम्युलंट्सचा वापर वाढला-climate change affectted grape production in maharashtra ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Grape Production: वातावरण बदलाचा द्राक्ष उत्पादनावर घातक परिणाम; बायोस्टिम्युलंट्सचा वापर वाढला

Grape Production: वातावरण बदलाचा द्राक्ष उत्पादनावर घातक परिणाम; बायोस्टिम्युलंट्सचा वापर वाढला

HT Marathi Desk HT Marathi
Aug 28, 2023 11:40 AM IST

Grape Production in Maharashtra: कृत्रिम रसायने आणि हवामान बदल यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अशावेळी उत्तम गुणवत्तेच्या फळांचे उत्पादन घेण्यासाठी भारतीय शेतकरी मोठ्या प्रमाणावर बायोस्टिम्युलंट्सच्या वापर करत असल्याचं दिसून येत आहे.

Grape Farming in Maharashtra
Grape Farming in Maharashtra

वातावरण बदलामुळे गेल्या मोसमात अनेक वेळा ठिकठिकाणी अवेळी पाऊस पडला. या वातावरण बदलाचा फटका अनेक पिकांना बसला असून नाशिक, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक बागाईतदारांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. ‘महाराष्ट्रातील द्राक्ष बागाईतदारांपुढील आव्हानं’ या विषयावर मुंबईत आयोजित चर्चासत्रात नाशिक जिल्ह्यातून आलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. गोदरेज अॅग्रोव्हेट लिमिटेडद्वारे उत्पादित ‘कंबाईन’ या जैविक उत्तेजक औषधीच्या उत्पादनाला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं.

भारतात दरवर्षी १.२ लाख शेतकरी एकूण ३ लाख एकर जमिनीवर द्राक्षे पिकवतात. भारतातील एकूण लागवड केलेल्या द्राक्षांपैकी ७० टक्के द्राक्षे ही निर्यात केली जातात. भारत हा द्राक्षांची निर्यात करणारा जगातला ११वा सर्वात मोठा देश म्हणून गणला जातो. गेल्या दशकभराच्या कालावधीत द्राक्षांच्या एकूण निर्यातीमध्ये १२.६ टक्के एवढी वाढ झाली आहे. निर्यातक्षम द्राक्षे पिकवताना कंबाईन या जैविक उत्तेजक औषधीमुळे फळांना बेरीसारखा आकार आणि अपेक्षित रंग मिळविण्यात मदत होत असून द्राक्ष फळांवर बुरशीचा प्रादुर्भाव कमी करण्यातही मदत होत असल्याचा दावा जीएव्हीएलचे क्रॉप प्रोटेक्शन बिझनेसचे सीईओ एन. के. राजावेलू यांनी यावेळी केला. संयुक्त राष्ट्रसंघाच्या युरोपसाठीच्या आर्थिक महासंघाने तयार केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांशी सुसंगत द्राक्षाचा दर्जा वाढवण्यासाठी 'कम्बाइन' हे राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचे साधन असल्याचं राजावेलू म्हणाले.

यावेळी गोदरेज अॅग्रोव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बलराम सिंग यादव म्हणाले, ‘भारतासारख्या उष्णकटीबंधीय देशात शेतकऱ्यांना त्यांच्या द्राक्षांचे चांगले उत्पादन आणि गुणवत्ता मिळवून देण्यात ‘कंबाईन’ जैव उत्तेजक फवारणी औषधाचा मोठा वाटा आहे. दरवर्षी सुमारे दीड लाख एकर जमिनीवर द्राक्षे पिकवणारे ९० हजार शेतकरी या बायोस्टिम्युलंटचा वापर करत असल्याची माहिती यादव यांनी यावेळी दिली. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना जागतिक गुणवत्ता मानकांनुसार फलोत्पादन करण्यास सक्षम करून त्यांना उत्तम गुणवत्तेचे फलोत्पादन करण्यास मदत होत असल्यातं मत यादव यांनी मांडलं.

एकीकडे कृत्रिम रसायने आणि हवामान बदल यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अशावेळी उत्तम गुणवत्तेच्या फळांचे उत्पादन घेण्यासाठी भारतीय शेतकरी मोठ्या प्रमाणावर बायोस्टिम्युलंट्सच्या वापर करत असल्याचं यादव यावेळी म्हणाले.

संबंधित बातम्या