Share Market Updates : इराया लाइफस्पेस लिमिटेड या कंपनीचा शेअर सातत्यानं वाढत असून या शेअरनं चमत्कार केला आहे. मागच्या महिनाभरातील २२ ट्रेडिंग सत्रात या शेअरमध्ये तब्बल १३० टक्क्यांची वाढ झाली आहे. या कालावधीत शेअरची किंमत १२६९ रुपयांवरून २८८८.६५ रुपयांवर पोहोचली असून गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले आहेत.
इराया लाइफस्पेसच्या शेअरनं बुधवारी ५ टक्क्यांचा उच्चांक गाठला आणि हा शेअर २८८८.६५ रुपयांच्या इंट्राडे उच्चांकी पातळीवर पोहोचला. कंपनीच्या शेअर्समध्ये झालेल्या या वाढीमागे एक मोठं कारण आहे. अलीकडंच इराया लाइफस्पेसनं आपली उपकंपनी एबिक्स सिंगापूर आणि अर्न्स्ट अँड यंग (ई अँड वाय) यांच्याशी संबंधित कायदेशीर घडामोडींची माहिती जाहीर केली आहे. त्याचा हा परिणाम असल्याचं बोललं जात आहे.
वर्षभरात हा शेअर ७,७०० टक्क्यांनी वधारला असून गेल्या दोन वर्षांत ३६,८३९ टक्क्यांनी वधारला आहे. वर्षभरापूर्वी या शेअरची किंमत अवघी ३७ रुपये (९ ऑक्टोबर २०२३) होती. गेल्या पाच वर्षांत या शेअरमध्ये ३८,००८ टक्क्यांची वाढ झाली आहे. यंदाच्या कॅलेंडर वर्षात हा शेअर आतापर्यंत २३०० टक्के वाढला आहे. गेल्या सहा महिन्यांत त्यात ६०० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.
ट्रेंडलाइन शेअरहोल्डिंग डेटानुसार, ऑगस्ट २०२४ च्या अखेरीस कंपनीत सर्वसामान्य गुंतवणूकदारांचा वाटा ४६.१ टक्के आहे, तर प्रवर्तकांकडे ३६.२ टक्के शेअर आहेत. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडे (FII) १७.७ टक्के शेअर आहेत.
२०२१ पासून एबिक्स संपूर्ण भारतात पीएनबीचे एन्टरप्राइझ-वाइड नेटवर्कचं व्यवस्थापन करत आहे. या करारामध्ये पीएनबीच्या १०,८०० शाखा, ५,००० एटीएम आणि पीएनबी पुरस्कृत प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या ४,००० शाखांचा समावेश आहे. कंपनीनं सेबीला दिलेल्या माहितीनुसार, इबिक्स कॅश दिल्लीत अत्याधुनिक डेटा सेंटर, अॅडव्हान्स नेटवर्क ऑपरेशन सेंटर आणि मुंबईतील आपत्ती पुनर्वसन केंद्रासह १३ विभागीय कार्यालये आणि १३१ सर्कल कार्यालयांची देखरेख करेल.
संबंधित बातम्या